
चालू घडामोडी 11, मार्च 2025 | देशातील 58 वा व्याघ्रप्रकल्प कोणता ? | Which is the 58th tiger reserve in India ?

देशातील 58 वा व्याघ्रप्रकल्प कोणता ?
Which is the 58th Tiger Reserve in India ?
Subject : GS - पर्यावरण - व्याघ्रप्रकल्प
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील 58 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले. तर हा व्याघ्रप्रकल्प खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. हिमाचल प्रदेश
3. मध्य प्रदेश
4. गुजरात
उत्तर : मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
बातमी काय आहे ?
• केंद्र सरकारने अलीकडेच मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील 58 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले.

माधव राष्ट्रीय उद्याना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• माधव राष्ट्रीय उद्यान हा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आहे.
• माधव राष्ट्रीय उद्यान विंध्या टेकड्यांचा एक भाग आहे.
• 1958 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
• माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील 58 वा व्याघ्र प्रकल्प असुन
• मध्य प्रदेशातील 9वा व्याघ्र प्रकल्प आहे.
माधव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे ?
• विविध वन्यजीव,निसर्गरम्य तलाव, पक्षी निरीक्षण आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
• त्याचप्रमाणे मुघल सम्राट आणि ग्वाल्हेरच्या महाराजांचे ऐतिहासिक शिकारस्थान म्हणून ही माधव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे.
माधव राष्ट्रीय उद्यानातून कोणते राष्ट्रीय महामार्ग जातात ?
• राष्ट्रीय महामार्ग-25 (जुना झाशी रोड) आणि राष्ट्रीय महामार्ग-3 (आग्रा-मुंबई रोड) हे राष्ट्रीय महामार्ग माधव राष्ट्रीय उद्यानातून जातात.
मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्प :
Tiger Reserve in Madhya Pradesh :
1. कान्हा व्याघ्र प्रकल्प
2. बांधवगड व्याघ्र प्रकल्प
3. पेंच व्याघ्र प्रकल्प
4. पन्ना व्याघ्र प्रकल्प
5. सातपुडा व्याघ्र प्रकल्प
6. संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प
7. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प
8. रातापानी व्याघ्र प्रकल्प
9. माधव राष्ट्रीय उद्यान
व्याघ्रप्रकल्प काय असतात ?
व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची प्रक्रिया काय असते ?
• व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्य आहे जे वाघांची संख्या सतत कमी होत असल्याने त्यांचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
• राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या कलम 38V च्या तरतुदींनुसार व्याघ्र प्रकल्प राज्य सरकारांद्वारे अधिसूचित केले जातात.
• कोणतेही क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकारला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
• वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात मानवी हस्तक्षेप आणि शिकार करण्यास पूर्णपणे बंदी आहे.
प्रोजेक्ट टायगर काय आहे ?
• प्रोजेक्ट टायगर हा भारतातील वन्यजीव संरक्षण उपक्रम आहे, जो 1973 मध्ये सुरू करण्यात आला होता.
• भारतामध्ये धोक्यात असलेल्या वाघाच्या संरक्षणासाठी भारत सरकारच्या पर्यावरण , वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रोजेक्ट टायगर सुरू केला.
• प्रोजेक्ट टायगरचे प्राथमिक उद्दिष्ट समर्पित व्याघ्र अभयारण्य निर्माण करून वाघांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात देखभाल करणे आणि त्यांची संख्या वाढवणे हे आहे.
• 1973 मध्ये केवळ 9 व्याघ्रप्रकल्पापासून प्रोजेक्ट टायगरची सुरवात झाली आज (मार्च 2025) भारतात 58 व्याघ्रप्रकल्प आहे.

भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता ?
भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
1. देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आहे.
2. देशातील 2 रा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्प आहे.
3. तर देशातील 3 रा मोठा व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्प आहे.