
चालू घडामोडी 10, मार्च 2025 | भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन | India's First Hydrogen Train

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन
India's First Hydrogen Train
Subject : GS - पर्यावरण, भूगोल - वाहतूक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल ?
1. दिल्ली - मुंबई
2. मुंबई - पुणे
3. आग्रा - वाराणसी
4. जिंद - सोनीपत
उत्तर : जिंद - सोनीपत
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाला देण्यात आली आहे.
• हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची पहिली चाचणी केली जाईल.
• Designed By : भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन लखनऊ येथे रिसर्च, डिझाइन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (Research, Design, and Standard Organization) डिझाइन केली आहे.
• Manufactured By : भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory) येथे तयार केली जात आहे.
• केंद्रीय अर्थसंकल्प : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रेल्वे मंत्रालयाने 35 हायड्रोजन फ्युअल सेल (Hydrogen Fuel Cell Trains) आधारित रेल्वे बनविण्यासाठी 2800 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
हायड्रोजन इंधन ट्रेनचे फायदे काय ?
• हायड्रोजन रेल्वे पर्यावरणपूरक आहेत.
• या गाड्या फक्त पाणी आणि उष्णता यांसारखे उप-उत्पादने निर्माण करतात,
• यामुळे कार्बन उत्सर्जन आणि ध्वनी प्रदूषण कमी होते.
• याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी वापरून शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असणार आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंधनावर चालणारे इंजिन कोणी विकसित केले आहे ?
• भारताने अलिकडेच 1200 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे.
• भारताने जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे.
• बहुतांश देशांनी 500 ते 600 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन तयार केल्या आहेत.
• सध्या, जगात जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन या चार देशांत हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे धावत आहेत.