क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
Krantijyoti Savitri Bai Phule
• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी.
• भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास- महाराष्ट्रातील समाजसुधारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, सातारा पोलीस भरती 2021, 2023)
1. कराड
2. वाई
3. अंग
4. नायगाव
उत्तर : नायगाव (सातारा जिल्हा)
• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.
• 1840 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
• लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली.
• 1848 रोजी जोतिराव फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि सावित्रीबाई फुले त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या.
• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या.
• 1852 मध्ये सावित्रीमाईंनी महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी महिला सेवा मंडळ सुरू केले.
• 1863 साली जोतीराव-सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली
• समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्त्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे जोतिराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना केली यात आणि अशा सर्वच कार्यात सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना लाभली.
• 1890 मध्ये ज्योतिबांच्या मृत्यूनंतर सावित्रीमाईंनी सत्यशोधक समाज या संस्थेचे कार्य पुढे नेले.
• 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीमाईंनी भूषविले.
• 1876-1877 आणि 1896 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
मृत्यू :
• 1897 पासून पुण्यात प्लेगची साथ आली, तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईंनी प्लेगबाधित रुग्णांची सेवाशुश्रूषा केली.
• पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.
साहित्य :
सावित्रीबाई या एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या.
• ‘ काव्यफुले’ (1854) - काव्यसंग्रह
• ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ (1892) - काव्यसंग्रह
• "जा, शिक्षण मिळवा" - कविता
महाराष्ट्रात बालिका दिन केव्हा असतो ?
• बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो.
• 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.
• महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.