
चालू घडामोडी 13, मार्च 2025 | भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण ? | India's first Woman Law Secretary

भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण ?
India's first Woman Law Secretary
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी पहिल्यांदा एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या महिला कोण आहेत ?
1. अंजू राठी राणा
2. सुजाता सौनिक
3. रश्मी शुक्ला
4. नीना सिंग
उत्तर : अंजू राठी राणा (Dr. Anju Rathi Rana)
IMP नोट :
1. अंजू राठी राणा : भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव
2. सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
3. रश्मी शुक्ला : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
4. नीना सिंग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) च्या पहिल्या महिला महासंचालक
बातमी काय आहे ?
• अलिकडेच डॉ. अंजू राठी राणा यांची कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
• याबरोबरच डॉ. अंजू राठी राणा या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव बनल्या आहेत.
• कायदा सचिव (Law Secretary) हे पद, ज्याला अधिकृतपणे कायदेशीर व्यवहार सचिव (Secretary, Legal Affairs) म्हणून ओळखले जाते.
• कायदेशीर बाबींच्या सचिव म्हणून, डॉ. अंजू राठी राणा देशाच्या कायदेशीर चौकटीचे निरीक्षण करतील, कायदेशीर बाबींवर सरकारला सल्ला देतील आणि कायदे तयार करण्यात आणि सुधारणांमध्ये मदत करतील.

डॉ. अंजू राठी राणा यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. अंजू राठी राणा या भारतीय कायदेशीर सेवेच्या (Indian Legal Service) अधिकारी आहेत.
• त्यांनी 18 वर्षे दिल्ली सरकारमध्ये सरकारी वकील म्हणून काम केले.
• 2017 मध्ये, त्या कायदा मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून रुजू झाल्या.
• कायदा सचिव (Law Secretary) या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत.
कायदा सचिव (Law Secretary) म्हणजे नेमकं काय ?
• हे भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या (Ministry of Law and Justice) अंतर्गत एक महत्त्वाचे पद आहे.
• त्याचे काम सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे आहे.
• न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करणे.
कायदा सचिव (Law Secretary) यांच्या जबाबदाऱ्या काय असतात ?
• विविध धोरणे आणि घटनात्मक बाबींवर केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देणे.
• नवीन कायदे आणि सुधारणांसाठी कायदे तयार करण्याचे पर्यवेक्षण करणे.
• भारत सरकारशी संबंधित प्रकरणांमध्ये खटल्यांचे व्यवस्थापन पाहणे.
• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय करारांचे कायदेशीर पालन सुनिश्चित करणे.
• प्रभावी प्रशासनासाठी न्यायपालिका, राज्य सरकारे आणि इतर कायदेशीर संस्थांशी समन्वय साधणे.