
चालू घडामोडी 12, मार्च 2025 | EY एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर इंडिया पुरस्कार | EY Entrepreneur Of The Year India Award

EY एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर इंडिया पुरस्कार
EY Entrepreneur Of The Year India Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) EY एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर इंडिया 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
(SSC CHSL 2020, 2021 परीक्षेत 2019 चा पुरस्कार विचारला होता.)
1. अशनीर ग्रोवर
2. नितीन कामथ
3. रितेश अग्रवाल
4. विराट कोहली
उत्तर : नितीन कामथ (Nithin Kamath)
बातमी काय आहे ?
• अलिकडेच नितीन कामथ यांना "EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 इंडिया" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• जून 2025 मध्ये मोंटे कार्लो येथे होणाऱ्या EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड्समध्ये नितीन कामत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
नितीन कामथ कोण आहेत ?
• नितीन कामथ हे ऑनलाइन स्टॉक ब्रोकिंग कंपनी जिरोधा लिमिटेडचे (Zerodha Limited) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Founderand CEO) आहेत.
• Zerodha कंपनी 2010 मध्ये स्थापन झाली.
• Zerodha Limited ने उच्च वॉल्यूम, कमी मार्जिन मॉडेलद्वारे देशात डिस्काउंट ब्रोकरेज मॉडेलचा पाया रचला.

2024 च्या EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 इंडिया" जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
• के.व्ही. कामथ, यांना जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) देण्यात आला.
• के.व्ही. कामथ हे जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचे (Jio Financial Service Limited) स्वतंत्र संचालक आणि गैर-कार्यकारी अध्यक्ष (Independent Director and Non-executive Chairman )

2024 च्या EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 इंडिया" विशेष ज्युरी पुरस्कार (Special Jury Award)कोणाला देण्यात आला ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांना Special Jury Award ने सन्मानित करण्यात आले.

EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया पुरस्काराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यवसाय पुरस्कारांपैकी एक आहे.
• हा पुरस्कार लंडनमधील जागतिक ब्रिटिश सल्लागार कंपनी अर्न्स्ट अँड यंग ग्लोबल लिमिटेडच्या (Ernst & Young Global Limited) भारतीय उपकंपनीकडून दिला जातो.
• सल्लागार (consulting), हमी, कायदा, धोरण, कर आणि व्यवहार यांसारख्या सेवा (Services) ही कंपनी देते.