
चालू घडामोडी 13, मार्च 2025 | धूम्रपान निषेध दिन | No Smoking Day

धूम्रपान निषेध दिन
No Smoking Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 या वर्षी धूम्रपान निषेध दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 1 मार्च
2. 12 मार्च
3. 26 मार्च
4. 2 एप्रिल
उत्तर : 12 मार्च
धूम्रपान निषेध दिन केव्हा साजरा केला जातो ?
• दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिन साजरा केला जातो.
• 2025 या वर्षी धूम्रपान निषेध दिन 12 मार्च रोजी साजरा केला.
धूम्रपान निषेध दिन का साजरी करतात ?
धूम्रपान निषेध दिनाचा मुख्य उद्देश कोणता ?
• या दिवसाचा मुख्य उद्देश धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करणे आणि तंबाखूच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
• हा दिवस निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची आणि तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्याची एक महत्त्वाची संधी प्रदान करतो.
• संशोधनातून असे दिसून आले आहे की या मोहिमेमुळे दहापैकी एका धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला यशस्वीरित्या धूम्रपान सोडण्यास मदत झाली आहे.
धूम्रपान निषेध दिन पहिल्यांदा कोठे आणि केव्हा साजरी करण्यात आला ?
धूम्रपान निषेध दिन ही जागरूकता मोहीम म्हणून पहिल्यांदा 1984 मध्ये युनायटेड किंग्डममध्ये सुरू करण्यात आली.
धूम्रपानाचे दुष्परिणाम कोणते ?
(Harmful Effects of Smoking)
• कर्करोग : धूम्रपानामुळे फुफ्फुसे, तोंड, घसा, मूत्रपिंड, मूत्राशय आणि इतर अवयवांचा कर्करोग होतो.
• हृदयरोग : धूम्रपानामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
• फुफ्फुसांचे आजार : क्रॉनिक ब्राँकायटिस आणि एम्फिसीमा सारखे फुफ्फुसांचे आजार होतात.
• इतर आरोग्य समस्या : धूम्रपानामुळे मधुमेह, ऑस्टियोपोरोसिस, वंध्यत्व आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका देखील वाढतो.

धूम्रपान सोडणे शक्य आहे का ?
हो
धूम्रपान सोडणे आव्हानात्मक असू शकते, परंतु धूम्रपान सोडणे शक्य आहे.
• शारीरिक हालचाल (Physical Activity) : नियमित व्यायाम धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यास मदत करू शकतो.
• सल्लामसलत (Counseling) : वैयक्तिक किंवा गट समुपदेशन प्रेरणा प्रदान करू शकते.
• औषधोपचार आणि थेरपी (Medication and Therapy) : निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (Nicotine Replacement Therapy) आणि इतर औषधे सोडण्यास मदत करू शकतात.
सरकारचे पाऊल :
• भारत सरकारने तंबाखूच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उत्पादकांवर धूम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देणे बंधनकारक केले आहे.
• त्याचप्रमाणे तेथे Helpline Number देणे बंधनकारक केले आहे.