
चालू घडामोडी 14, मार्च 2025 | 'वेटलँड वाईज यूज' रामसर पुरस्कार पहिली भारतीय व्यक्ती

वेटलँड वाईज यूज' रामसर पुरस्कार पहिली भारतीय व्यक्ती | First Indian to Receive Ramsar Award for Wetland Wise Use
Subject : GS - पुरस्कार, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ' वेटलँड वाईज यूज ' या रामसर पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?
1. जयश्री वेंकटेशन
2. मेधा पाटकर
3. सुधा मूर्ती
4. नीता अंबानी
उत्तर : जयश्री वेंकटेशन (Jayshree Vencatesan)
' वेटलँड वाईज यूज ' या रामसर पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. जयश्री वेंकटेशन यांना 'वेटलँड वाईज युज' (Wetland Wise Use) श्रेणीमध्ये प्रतिष्ठित रामसर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
• हा पुरस्कार जिंकणाऱ्या डॉ. जयश्री वेंकटेशन पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.
• 'वेटलँड वाईज युज' (Wetland Wise Use) रामसर पुरस्कार हा पाणथळ जागांच्या शाश्वत व्यवस्थापनात योगदान दिल्याबद्दल जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुरस्कार आहे.

'वेटलँड वाईज युज' (Wetland Wise Use) म्हणजे नेमकं काय ?
Wetland Wise Use म्हणजे त्या परिसरातील नैसर्गिक वैशिष्ट्ये जपून, शाश्वत विकासासाठी त्यांचा उपयोग करणे, जेणेकरून ते परिसंस्थेसाठी आणि मानवासाठी फायद्याचे राहतील.
डॉ. जयश्री वेंकटेशन यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. जयश्री वेंकटेशन या चेन्नई येथील केअर अर्थ ट्रस्टच्या सह-संस्थापक आहे.
• Care Earth Trust ही ट्रस्ट एक गैर-सरकारी संस्था (NGO) आहे जी संशोधन, वकिली आणि क्षमता बांधणीद्वारे जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी काम करते.
• डॉ. जयश्री वेंकटेसन यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक दशके भारतातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी समर्पित केली आहेत, ज्यामध्ये चेन्नईतील पल्लिकरणई दलदलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
• त्यांच्या संस्थेला 2009 मध्ये पल्लीकरणाई दलदल आणि नानमंगलम जंगलाच्या संवर्धनासाठी केलेल्या अग्रगण्य कार्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्काराने सन्मानित केले.
पाणथळ क्षेत्र (जागा) म्हणजे काय ?
• पाणथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पाणी हे पर्यावरण आणि संबंधित वनस्पती आणि प्राणी जीवन नियंत्रित करणारे प्राथमिक घटक आहे.
• पाणथळ जमीन हे एक भूभाग आहे जेथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडलेला असतो. अशा भागात जलीय वनस्पतीं मोठ्या प्रमाणात असतात.