
चालू घडामोडी 15, मार्च 2025 | जागतिक ग्राहक हक्क | World Consumer Rights Day

जागतिक ग्राहक हक्क
World Consumer Rights Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा साजरी करतात ?
1. 24 डिसेंबर
2. 24 फेब्रुवारी
3. 8 मार्च
4. 15 मार्च
उत्तर : 15 मार्च
जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा आणि का साजरी करतात ?
• 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरी करतात.
• सर्व ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.
15 मार्च याच दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरी करतात ?
• 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी (John F. Kennedy) यांनी अमेरिकेन काँग्रेसला ग्राहक हक्कां संदर्भात संबोधित केले.
• ग्राहक हक्कांना औपचारिकरित्या संबोधित करणारे ते जागतिक पहिले नेते होते.
• जॉन एफ केनेडी यांच्या या संबोधनास्मरणार्थ 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जागतिक ग्राहक हक्क दिन पहिल्यांदा केव्हा साजरी करण्यात आला ?
15 मार्च 1983 रोजी पहिल्यांदा जागतिक ग्राहक हक्क दिन साजरी करण्यात आला.
जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of the World Consumer Rights Day 2025 ?
‘शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल.’ ही जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 वर्षाची संकल्पना आहे.
‘A Just Transition to Sustainable Lifestyles.’
• ही संकल्पना, शाश्वत जीवनशैली साध्य करण्यासाठी आवश्यक मार्गांवर प्रकाश टाकते आणि जगभरात ग्राहक संरक्षण मजबूत आणि सक्षम करण्याचे आवाहन करते.
• सर्व ग्राहकांना परवडणारे, सुलभ शाश्वत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे पर्याय तातडीने उपलब्ध करुन देण्याची गरज या संकल्पनेतून प्रतिबिंबित होते.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचे हक्क कोणते ?
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत.
- सुरक्षेचा हक्क (Right to Security)
- माहितीचा हक्क (Right to Information)
- निवड करण्याचा अधिकार (Right to Choose)
- म्हणणे मांडण्याचा हक्क (Right to have a say)
- तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क (Right to Grievance and Redressal)
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार (Right to Education of Consumer Rights)
IMP नोट :
• जागतिक ग्राहक हक्क दिन : 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन असतो. तर
• राष्ट्रीय ग्राहक दिन : भारतात दरवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.