
चालू घडामोडी 15, मार्च 2025 | IIFA Awards 2025

आयफा अवॉर्ड्स 2025
IIFA Awards 2025
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आयफा अवॉर्ड्स 2025 (IIFA Awards 2025) मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला ?
1. लापता लेडीज
2. भूल भुलैया 3
3. शैतान
4. किल
उत्तर : लापता लेडीज
बातमी काय आहे ?
• आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी अर्थात (IIFA) पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
• या भव्य कार्यक्रमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांचा सन्मान करून आपला 25 वा वर्धापन दिन साजरा केला.
• या सोहळ्यात 2024 मध्ये प्रदर्शित (रिलीज) झालेल्या उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आलं.
• या सोहळ्यात सर्वात जास्त पुरस्कार पटकावणारा सिनेमा " लापता लेडीज " ठरला.
IIFA पुरस्कार 2025 कोठे आयोजित करण्यात आला ?
8 ते 9 मार्च 2025 दरम्यान जयपूर (राजस्थान) येथे IIFA पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आला.
IIFA पुरस्काराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• IIFA चा फूल फॅार्म : International Indian Film Academy
• IIFA पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे.
• आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार, ज्याला सामान्यतः आयफा (IIFA) म्हणून ओळखले जाते, हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी वार्षिक पुरस्कार सोहळा आहे.
• पहिला आयफा सोहळा 2000 मध्ये युनायटेड किंग्डम येथील लंडन शहरात आयोजित करण्यात आला होता.
• तेव्हापासून, जगभरातील विविध ठिकाणी पुरस्कारांचे आयोजन केले जात आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे पुरस्कार

इतर महत्त्वाचे पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रवी किशन (लापता लेडीज)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - जानकी बोड़ीवाला (शैतान)
• सर्वोत्कृष्ट गायक - जुबिन नौटियाल- दुआ (आर्टिकल 370)
• सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल- मेरे ढोलना (भूल भुलैया 3)
• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संपत राय (लापता लेडीज)
• सर्वोत्कृष्ट गीतकार -प्रशांत पांडे - सजनी रे (लापता लेडीज)
• सर्वोत्कृष्ट VFX - रेड चिलीज VFX - भूल भुलैया 3