
चालू घडामोडी 18, मार्च 2025 | जागतिक पुनर्वापर दिन | Global Recycling Day

जागतिक पुनर्वापर दिन
Global Recycling Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिन (Global recycling Day) केव्हा साजरा केला जातो ?
1. 8 मार्च
2. 10 मार्च
3. 18 मार्च
4. 28 मार्च
उत्तर : 18 मार्च
बातमी काय आहे ?
दरवर्षी 18 मार्च रोजी जागतिक पुनर्वापर दिन (Global Recycling Day) साजरा केला जातो.
पुनर्वापर (Recycling) म्हणजे काय ?
• पुनर्वापर म्हणजे वापरलेल्या वस्तूंना किंवा कचरा म्हणून फेकून दिलेल्या वस्तूंना पुन्हा वापरात बनवणे, किंवा पर्यावरण पूरक घटकांमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे.
• पुनर्वापर म्हणजे टाकाऊ पदार्थ गोळा करणे, त्यांचे कच्च्या मालात रूपांतर करणे आणि नवीन उत्पादनांमध्ये रूपांतरित करणे.
• उदाहरणार्थ :
- पेपर रद्दीपासून पुन्हा वापरण्या योग्य वही बनविणे.
- कचरा म्हणून फेकून दिलेले प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्यांची नवीन वस्तू बनवणे इत्यादी.
जागतिक पुनर्वापर दिनाचे उद्दिष्ट्ये कोणती ?
जागतिक पुनर्वापर दिन का साजरी करतात ?
• पुनर्वापराच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे
• लोकांना पुनर्वापर करण्यास प्रोत्साहित करणे
• पुनर्वापरासाठी धोरणे आणि कायदे लागू करणे
• पुनर्वापरावर संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे
पहिला जागतिक पुनर्वापर दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• पहिला जागतिक पुनर्वापर दिन 18 मार्च 2018 रोजी साजरा करण्यात आला.
• हा दिवस ग्लोबल रीसायकलिंग फाउंडेशनने (Global Recycling Foundation) आयोजित केला आहे.
जागतिक पुनर्वापर दिन 2025 या वर्षाची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of Global recycling Day 2025 ?
#RecyclingHeroes (रिसायक्लिंग हिरोज्) ही जागतिक पुनर्वापर दिन 2025 या वर्षाची संकल्पना आहे.
यंदाची संकल्पना,पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी असाधारण प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि समुदायांना सन्मान करणारी आहे.
पुनर्वापराचे फायदे/महत्त्व कोणते ?
• पर्यावरण संवर्धन :
- पुनर्वापरामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते.
- हवा आणि जल प्रदूषण कमी होते.
- हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून हवामान बदलाशी लढण्यास मदत करते.
• ऊर्जा बचत : पुनर्वापर प्रक्रियेत नवीन उत्पादनांपेक्षा कमी ऊर्जा वापरली जाते.
• कचरा व्यवस्थापन : कचरा कचराकुंडीत कमी जातो, त्यामुळे प्रदूषण कमी होते.
• रोजगार निर्मिती : नवीन रोजगार निर्माण होतात आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
