
चालू घडामोडी 18, मार्च 2025 | रायसीना डायलॉग 2025 | Raisina Dialogue 2025

रायसीना डायलॉग 2025
Raisina Dialogue 2025
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 च्या 10 व्या रायसीना संवाद कार्यक्रमाची संकल्पना (थीम) काय आहे ?
1. वैश्विक आरोग्य आणि पर्यावरण
2. महिला सक्षमीकरण
3. कृत्रिम बुद्धिमत्ता : डिजिटल अर्थव्यवस्थेचे भवितव्य
4. कालचक्र : लोक, शांती आणि पृथ्वी
उत्तर : कालचक्र : लोक, शांती आणि पृथ्वी
बातमी काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीत 10 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले.

10 व्या रायसीना संवादा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताने नवी दिल्ली येथे 10 व्या रायसीना संवाद 2025 (Raisina Dialogue 2025) चे आयोजन केले.
• ज्यामध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
• 10 व्या रायसीना संवादात 125 देशांमधील सुमारे 3500 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
रायसीना संवाद म्हणजे काय ?
• रायसीना संवाद ही भारतीय दृष्टिकोनातून भू-राजकीय (Geopolitics) आणि भू-अर्थशास्त्रावरील (Geo-Economics) एक प्रमुख परिषद आहे.
• रायसीना संवाद जागतिक नेते, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग तज्ञ या क्षेत्रांतील तज्ञांना आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि संवाद आणि वादविवादाद्वारे त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
रायसीना संवाद कोण आयोजित करते ?
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) च्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाद्वारे (Ministry of External Affairs) दरवर्षी रायसीना संवाद आयोजित केले जातो.
रायसीना संवाद का म्हटले जाते ?
• या संवादाचे नाव नवी दिल्लीतील रायसीना टेकडी (Raisina Hills) वरून ठेवण्यात आले आहे.
• रायसीना हिल्स हे सामान्यतः भारत सरकारच्या सत्तेचे केंद्र मानले जाते.
• हे नवी दिल्लीतील एक क्षेत्र आहे, जिथे भारतातील काही महत्त्वाच्या इमारती आहेत.
• रायसीना टेकडीवर भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
• तसेच भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेले राष्ट्रपती भवन आणि सचिवालय इमारत, ज्यामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि इतर अनेक महत्त्वाची मंत्रालये येथेच आहेत.
पहिला रायसीना संवाद केव्हा आयोजित करण्यात आला ?
पहिला रायसीना संवाद 2016 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून दरवर्षी हा संवाद आयोजित केला जातो.

2025 च्या 10 व्या रायसीना संवाद कार्यक्रमाची संकल्पना (थीम) काय आहे ?
" कालचक्र : लोक, शांती आणि पृथ्वी " ही 10 व्या रायसीना संवादाची संकल्पना आहे.
“ Kālachakra – People, Peace and Planet ”
