
चालू घडामोडी 19, मार्च 2025 | 5G Innovation Hackathon 2025

5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025
5G Innovation Hackathon 2025
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी कोणी 5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 ची घोषणा केली?
1. नीती आयोग
2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
3. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
4. केंद्रीय दूरसंचार विभाग
उत्तर : केंद्रीय दूरसंचार विभाग (Department of Telecommunications)
बातमी काय आहे ?
दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) 5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 ची घोषणा केली आहे.
5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 का आयोजित करण्यात आले ?
• सामाजिक आणि औद्योगिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण 5G आधारीत उपायांच्या विकासाला गती देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
• याचा उद्देश 50 पेक्षा अधिक प्रसारयोग्य 5G प्रोटोटाइप्स विकसित करणे, 25+ पेटंट्स निर्माण करणे, शैक्षणिक-सांस्थिक-सरकारी सहकार्य बळकट करणे आणि स्टार्टअप निर्मितीस पाठबळ देणे हा आहे.
• विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी खुला असलेला हा कार्यक्रम मार्गदर्शन, निधी पुरवठा आणि 100 हून अधिक 5G युज केस लॅब्सपर्यंत पोहोच प्रदान करत आहे, ज्यामुळे सहभागींना कल्पनांचे (Idea) तंत्रज्ञानात रूपांतर करण्यास मदत मिळते.
5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 चे विषय कोणते ?
5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 कोण - कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल ?
• हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारीत नेटवर्क देखभाल, माहिती तंत्रज्ञान-सक्षम उपाय, 5G प्रसारण, स्मार्ट आरोग्य, शेती, औद्योगिक ऑटोमेशन, नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क्स (NTN), डी2एम(D2M), व्ही2एक्स(V2X) आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या प्रमुख 5G अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणारे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.
• सहभागींना वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी नेटवर्क स्लाइसिंग, सेवेची गुणवत्ता आणि कॉल-फ्लो परिस्थिती यासारख्या 5G वैशिष्ट्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.
5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 साठी आर्थिक तरतूद :
• या उपक्रमासाठी 1.5 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
• ज्यामध्ये बीज भांडवल (Seed Funding), बौद्धिक संपदा सहाय्य (IPR Assistance), मार्गदर्शन (Mentorship) आणि ॲापरेशनल खर्च (Operational Costs) यांचा समावेश आहे.
• हा या उपक्रम 6 महिने चालणार आहे.
• 15 मार्च - 15 एप्रिल 2025 दरम्यान प्रस्ताव सादर करणे
• 1 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम विजेत्यांची घोषणा केली जाईल.
पुरस्कार आणि मान्यता :
1. प्रथम क्रमांक : 5,00,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी,
2. द्वितीय क्रमांक : 3,00,000 रुपये उपविजेत्यासाठी
3. तृतीय क्रमांक : 1,50,000 रुपये तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला दिले जातील.
• तसेच, सर्वोत्कृष्ट संकल्पना आणि सर्वाधिक नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप या विशेष पुरस्कारांसाठी प्रत्येकी 50,000 रुपये दिले जाईल.
• याशिवाय, 10 प्रयोगशाळांना उत्कृष्ट 5G युज केससाठी प्रशस्तिपत्रे, तसेच एक प्रशस्तिपत्र उदयोन्मुख संस्थेकडून सर्वोत्कृष्ट संकल्पनेसाठी प्रदान केले जाईल.