
चालू घडामोडी 19, मार्च 2025 | स्टुअर्ट यंग बनले पंतप्रधान | Stuart Young becomes Prime Minister

स्टुअर्ट यंग बनले पंतप्रधान
Stuart Young becomes Prime Minister
Subject : GS - जगाचा भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच स्टुअर्ट यंग यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ?
1. मंगोलिया
2. न्यूझीलंड
3. पोलंड
4. त्रिनिदाद आणि टोबॅगो
उत्तर : त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago)
बातमी काय आहे ?
स्टुअर्ट यंग(Stuart Young) त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे पंतप्रधान बनले
त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• त्रिनिदाद आणि टोबॅगो हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट राष्ट्र आहे.
• या देशात त्रिनिदाद आणि टोबॅगो ही दोन प्रमुख बेटे आहेत.
• पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) ही त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाची राजधानी आहे.
• 1962 मध्ये ब्रिटनकडून या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
• 1976 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक देश म्हणून स्थापन झाले.
• त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात भारतीय वंशाचे लोक राहतात.
• 1845 मध्ये भारतीय मजुरांच्या पहिल्या गटाला कॅरिबियन बेटावर आणण्यात आले, ज्यामुळे भारतीय लोक तेथील लोकसंख्येतील एक मोठा वांशिक गट बनले.
• ड्वेन ब्राव्हो, सुनील नरेन आणि किरॉन पोलार्ड यांसारखे त्रिनिदादी क्रिकेटपटू (Trinidadian Cricketer) भारतात लोकप्रिय आहेत.
• या देशात तेल आणि वायूचा मोठा साठा आहे, ज्यामुळे त्याची अर्थव्यवस्था प्रबळ झाली आहे.
• त्रिनिदाद आणि टोबॅगो कॅरिबियनमधील एक विकसित आणि समृद्ध देश मानला जातो, ज्यामध्ये दरडोई उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक आहे.