
चालू घडामोडी 19, मार्च 2025 | PM-YUVA 3.0 योजना | PM-YUVA 3.0 Scheme
PM-YUVA 3.0 योजना | PM-YUVA 3.0 Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच पीएम-युवा 3.0 (PM-YUVA 3.0) योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट काय ?
1. देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे
2. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणे
3. युवा नेत्यांसाठी मार्गदर्शन करणे
4. युवा खेळाडूंना ऑलम्पिक साठी तयार करणे
उत्तर : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे
बातमी काय आहे ?
पीएम-युवा योजनेच्या पहिल्या दोन कार्यक्रमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता, तसेच 22 वेगवेगळ्या भारतीय भाषा आणि इंग्रजीतील तरुण आणि नवोदित लेखकांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग लक्षात घेता, आता पीएम-युवा 3.0 योजना सुरु केली जात आहे.
PM-YUVA 3.0 योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू करण्यात आली ?
• केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Education) अंतर्गत पीएम-युवा 3.0 (PM-YUVA 3.0) योजना सुरू करण्यात आली आहे.
• केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने 11 मार्च 2025 रोजी, या युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या या योजनेचा प्रारंभ केला.
PM-YUVA 3.0 योजना काय आहे ?
पीएम-युवा 3.0 (युवा, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक)
PM-YUVA 3.0 (Young, Upcoming and Versatile Authors)
• अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 50 लेखकांची निवड केली जाईल.
• 30 जून ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत नामवंत लेखक/मार्गदर्शकांकडून तरुण लेखकांना प्रशिक्षण देण्यात येईल.
• नवी दिल्ली येथे होणार्या जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये पीएम-युवा 3.0 मधील लेखकांसाठी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जाईल.
PM-YUVA 3.0 चे प्रमुख विषय कोणते ?
1) राष्ट्र उभारणीमधील भारतीय वंशाच्या समुदायाचे योगदान
2) भारतीय ज्ञान प्रणाली आणि
3) आधुनिक भारताचे निर्माते (1950 - 2025)
पीएम-युवा 3.0 योजनेचे उद्दिष्ट्य कोणते ?
पीएम-युवा 3.0 योजना का सुरू करण्यात आली ?
• देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी
• भारत आणि भारतीय लेखनाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (30 वर्षांखालील) प्रशिक्षित करण्यासाठी
• अशा प्रकारे भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञानव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांचा प्रवाह विकसित व्हायला ही योजना उपयोगी ठरेल.