
चालू घडामोडी 12, ऑक्टोबर 2024

21 वी आसियान -भारत शिखर परिषद 2024
21st ASEAN-INDIA Summit 2024
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 21 वी आसियान-भारत शिखर परिषद कोठे पार पडली ?
1. भारत
2. लाओस
3. मलेशिया
4. सिंगापूर
उत्तर : लाओस
बातम्यांमध्ये : लाओसची राजधानी व्हिएन्टिन येथे 10 ऑक्टोबर 2024 रोजी 21वी आसियान-भारत शिखर परिषद पार पडली.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आसियान देशांचे ऐक्य, आसियान केंद्रित धोरण आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्राबाबत आसियान देशांच्या दृष्टीकोनाला भारताचा पाठींबा असल्याचा पुनरुच्चार केला.

आसियान म्हणजे काय ?
What is ASEAN ?
• ASEAN म्हणजे Association of Southeast Asian Nations.
• दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) हा एक प्रादेशिक गट आहे.
• आसियान ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.
• स्थापना : आसियानची स्थापना ८ ऑगस्ट १९६७ रोजी गेली.
• या संघटनेचा उद्देश त्यांच्या सदस्य देशांमध्ये आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याला प्रोत्साहन देणे हे आहे.
आसियान संघटने मध्ये किती देश आहे ? आणि कोणते ?
• आसियान संघटनेमध्ये 10 देश आहे.
• ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम.
• तिमोर-लेस्टे देश 2022 मध्ये ASEAN मध्ये निरीक्षक म्हणून सामील झाला. ASEAN ने तिमोर-लेस्टेचा 11 वा सदस्य म्हणून स्वीकार करण्यास तत्वतः सहमती दर्शवली आहे.

नोट : भारत आसियान संघटनेचा सदस्य देश नाही.
आसियानचे (ASEAN) ब्रीदवाक्य काय आहे ?
"एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय" हे आसियानचे ब्रीदवाक्य आहे.
आसियानचे (ASEAN) सचिवालय कोठे आहे ?
ASEAN सचिवालय जकार्ता, इंडोनेशिया येथे स्थित आहे.
आसियान + 6 ग्रुप म्हणजे काय ?
• आसियान देश आणि 6 देश मिळून आसियान + 6 ग्रुप बनतो.
• या 6 देशांमध्ये भारत,चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचाही या देशांचा समावेश आहे.
TB आजार आणि नि:क्षय पोषण योजना
Nikshay Poshan Yojana
बातमी काय आहे ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व क्षयरुग्णांसाठी उपचारादरम्यान नि:क्षय पोषण योजनेअंतर्गत मासिक पोषण सहाय्य सध्याच्या 500 रुपयांवरून 1,000 रुपये प्रति महिना केले आहे.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्षयरोग हा ------ मुळे होणारा रोग आहे.
1. विषाणू
2. जीवाणू
3. बुरशी
4. यांपैकी नाही
उत्तर : जीवाणूमुळे

नि:क्षय पोषण योजना काय आहे ?
• नि:क्षय पोषण योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत सुरू केली होती.
• ही भारतातील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National Tuberculosis Elimination Program) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण योजना आहे.
• नि:क्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते.
• आर्थिक सहाय्य : जो रूग्ण TB विरोधी उपचार घेत आहेत, त्याला दर महिन्याला 1000 रूपये या प्रमाणे त्याच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात.
नि:क्षय पोषण योजनचे उद्दिष्ट काय आहे ?
क्षयरोगाच्या (TB) रुग्णांना पोषण आधारासाठी प्रोत्साहन देणे.
क्षयरोग (TB) आजार कसा होतो ?
• क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जीवाणूंमुळे (Bacteria) होणारा रोग आहे.
• क्षयरोग (TB) हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्या किंवा शिंकण्यातील लहान थेंबांच्या श्वासाद्वारे पसरणारा एक जिवाणूजन्य आजार आहे.
क्षयरोग कसा पसरतो ?
क्षयरोग हा फुफ्फुसात सक्रिय क्षयरोग असलेल्या लोकांनाकडून खोकला, थुंकणे, बोलणे किंवा शिंकताना हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.
क्षय रोगाची लक्षणे काय आहेत ?
दीर्घकाळापर्यंत खोकला (कधीकधी रक्तासह), छातीत दुखणे, अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे.
क्षय रोगा वरील उपचार काय आहेत ?
• उपचाराने, TB बरा होऊ शकतो.
• प्रतिजैविकांचा (antibiotics) कोर्स सहसा 6-18 महिन्यांसाठी घ्यावा लागतो.
क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणी लावला ? जागतिक क्षयरोग दिन केव्हा असतो ?
• इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.
• त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
राष्ट्रीय कृषी संहिता काय आहे ?
National Agriculture Code
बातमी काय आहे ?
भारतीय मानक संस्था (Bureau of Indian Standards) राष्ट्रीय कृषी संहिता (National Agriculture Code) तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे, जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो संपूर्ण कृषी चक्रामध्ये मानके स्थापित करण्याचा प्रयत्न करतो.
Subject : GS - शेती, सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय कृषी संहितेबद्दल दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान निवडा.
1. पीक निवड ते साठवणूक या सर्व कृषी प्रक्रियांचा समावेश राष्ट्रीय कृषी संहिते मध्ये केला जाईल.
2. यात सेंद्रिय शेती आणि शेतीमध्ये इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या आधुनिक पद्धतींसाठी मानके समाविष्ट करेल.
3. भारतीय मानक संस्था राष्ट्रीय कृषी संहिता तयार करेल
4. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे.
उत्तर : वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे.

राष्ट्रीय कृषी संहिता काय आहे ?
• उद्दिष्टे: कृषी-हवामान क्षेत्र, पिकांचे प्रकार, सामाजिक-आर्थिक विविधता आणि कृषी-अन्न मूल्य साखळीतील सर्व पैलूंचा विचार करणारी राष्ट्रीय संहिता तयार करणे.
• राष्ट्रीय कृषी संहितेचे उद्दिष्ट आहे की शेताच्या तयारीपासून उत्पादनाच्या साठवणुकीपर्यंत संपूर्ण कृषी चक्रामध्ये कृषी पद्धतींसाठी एक प्रमाणित फ्रेमवर्क स्थापित करणे.
• पीक निवड, जमीन तयार करणे, पेरणी, सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन, कापणी, काढणी पश्चात ऑपरेशन्स आणि स्टोरेज यासह सर्व कृषी प्रक्रियांचा समावेश राष्ट्रीय कृषी संहिते मध्ये केला जाईल.
• यात खते, कीटकनाशके आणि तणनाशके यांसारख्या घटकांसाठी मानकांचाही (standards) समावेश असेल.
• नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि शेतीमध्ये इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या आधुनिक पद्धतींसाठी मानके (standards) समाविष्ट करेल.
• राष्ट्रीय कृषी संहितेमुळे शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक प्रदान करणे, कृषी पद्धतींमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेणे सोपे होईल.
राष्ट्रीय कृषी संहिता यात मानकांची रचना कशी केली जाईल ?
यात कोड दोन भागांमध्ये विभागला जाईल
1. पहिला भाग सर्व पिकांना लागू होणारी सामान्य तत्त्वे दर्शवेल.
2. दुसरा भाग भात, गहू, तेलबिया आणि कडधान्ये यासारख्या विविध प्रकारच्या पिकांसाठी पीक-विशिष्ट मानकांवर लक्ष केंद्रित करेल.
राष्ट्रीय कृषी संहितेचा फायदा काय ?
राष्ट्रीय कृषी संहिता शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि धोरणकर्ते यांच्यासाठी एक संदर्भ म्हणून काम करेल, त्यांना माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास आणि त्यांच्या कामकाजात सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्यात मदत करेल.