
चालू घडामोडी 14, ऑक्टोबर 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
बातम्यांमध्ये : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल योग्य विधान निवडा.
1. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.
2. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. हे विधान बरोबर आहे.
राज्यातील निवडक जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. म्हणून पर्याय 1) चूकीचा आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा उद्देश काय आहे ?
राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना दोन टप्प्यांत :
• पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता.
• दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 21 जिल्ह्यातील 6959 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
• या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार ?
• गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोकसहभागीय नियोजन करणे.
• प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक व गरजांवर आधारित कार्यपद्धती.
• कृषी विभागाच्या तांत्रिक सहकार्याने प्रकल्प समिती गावचा विकास आराखडा तयार करते.
• प्रकल्पाच्या सहाय्याने बदलत्या हवामानात शेतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा आराखडा पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर दिला जातो.
• मागणी नुसार लाभ या तत्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी आहे.
• महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे नामनिर्देशन केले जाईल यासाठी ऑनलाईन व कागदविरहित (paperless) प्रणालीचा वापर केला जाईल.
नानाजी देशमुख कोण आहेत ?
नानाजी देशमुख, भारतातील एक समाजसुधारक आणि राजकारणी होते. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केले.
नानाजी देशमुख यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇
अरोरा म्हणजे काय ?
What are Auroras ?
बातमी काय आहे ?
• अरोरा बोरेलिसमुळे रात्री आकाश, रंगीबेरंगी रोषणाई उजळून निघाले.
• ही घटना अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी आणि भारतातील लडाखमधील हॅनले गावासह जगाच्या काही भागांमध्ये दिसली.
Subject : GS - भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर लाल - हिरव्या रंगाचा प्रकाश खालीलपैकी कोणता थरातील उत्सर्जनामुळे (रेडिएशनमुळे) दिसतो ?
1. तपांबर
2. स्थितांबर
3. आयनांबर
4. स्तपस्तब्धी
उत्तर : आयनांबर

अरोरा (Aurorara) म्हणजे काय ?
• अरोरा हे नैसर्गिक लाइट्स आहेत. आकाशात निळ्या, लाल, पिवळ्या, नारंगी, हिरव्या अशा विविध रंगांमध्ये प्रकाश किरणे दिसून येतात यालाच अरोरा असे म्हणतात.
• फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ही एक निसर्गाची अद्भुत रोषणाई आहे.
• हे प्रकाश किरणे संपूर्ण वर्षभर उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दोन्ही ध्रुवाजवळ दिसतात परंतु काही वेळा ते कमी अक्षांशापर्यंत विस्तारतात.
• नॉर्दन लाईट्सला (उत्तर ध्रुवाजवळ) अरोरा बोरेलिस असे म्हणतात तर सदर्न लाईट्सला (दक्षिण ध्रुवाजवळ) अरोरा ऑस्ट्रेलिस असे म्हणतात.
अरोराची (Aurorara) निर्मिती कशी होते ?
• अरोरा हे सौर वाऱ्यामुळेआणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होतात.
• सूर्याच्या पृष्ठभागावरील घटनांमुळे सूर्य सतत विद्युत प्रभारीत कण (पार्टिकल्स) मुख्यतः इलेक्ट्रॉन, प्रोटॉन तसेच चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फील्ड) सोडत असतो यालाच सौर वारा (Solar Wind) असे म्हणतात.
• जसजसे सौर वारे पृथ्वीच्या जवळ येऊ लागतात, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते कण विचलित (Deflect) होतात.
• काही चार्ज कण पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र रेषांच्या खाली पृथ्वीच्या वरच्या वातावरणात म्हणजे आयनांबरात जातात.
• हे कण नंतर आयनांबरात उपलब्ध असलेल्या विविध वायूंबरोबर मिसळल्याने आकाशात विविध रंगांचा प्रकाश दिसतो.
• उदाहरणार्थ सौर वाऱ्यातील कण ऑक्सिजन सोबत मिसळतात तेव्हा हिरव्या रंगाचा प्रकाश दिसतो.
• नायट्रोजन सोबत मिसळल्यास निळ्या आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश निर्माण होतो.
भारतात कसे दिसले ?
• सूर्याच्या पृष्ठभागावरील घटना तीव्र झाल्यास सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होतो याला सौरस्फोट असे म्हणतात.
• ज्यामुळे या सौर वाऱ्यांची तीव्रता वाढते या तीव्र वाऱ्यांचा परिणाम चुंबकीय वादळात होतो यालाच चुंबकीय वादळे (Magnetic Storm) असे म्हणतात.
• यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तात्पुरता अडथळा निर्माण होऊन हे अरोरा मध्य अक्षांशमध्ये (भारतात) दिसू शकतात.
Tele MANAS App काय आहे ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच सरकारच्या योजनेअंतर्गत Tele MANAS App कशासाठी सुरू केले आहे ?
1. शेतीचे नुकसान नोंदणी साठी
2. शिष्यवृत्ती देण्यासाठी
3. बचतगटांना कर्ज काढण्याची मदत म्हणून
4. मानसिक त्रास होत असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन सेवा प्रदान करण्यासाठी
उत्तर : मानसिक त्रास होत असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन सेवा प्रदान करण्यासाठी

बातमी काय आहे ?
• जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) ने "TeleMANAS" ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.
• ज्यामुळे मानसिक त्रास होत असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन सेवा प्रदान केली जाते.
राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम (National Tele Mental Health Programme) काय आहे ?
• देशातील दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू करण्यात आले.
• Tele MANAS म्हणजे Tele Mental Health Assistance and Networking Across State
• हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2022 मध्ये सुरू करण्यात आले आहे.
• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मानसिक आरोग्याच्या प्रवेशातील अंतर भरून काढण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करणारी टोल-फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाइन 14416 सुरू केली.
Tele MANAS App काय आहे ? ते काय काम करते ?
• हे ॲप भारताच्या नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामचा एक भाग आहे आणि मानसिक आरोग्याविषयी माहितीचे सर्वसमावेशक लायब्ररी प्रदान करते.
• हे तणाव, चिंता आणि भावनिक आव्हानांच्या सुरुवातीच्या चिन्हे व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन देखील देते.
• या मोबाईल ॲप मार्फत भारतातील प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून समुपदेशन घेता येते.
• तसेच हे ॲप तत्काळ समुपदेशनासाठी गोपनीय मानसिक आरोग्य सहाय्य मिळवण्यात मदत करते.