
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जयंती

प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली 💐💐
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि देशाचा विकासासाठी त्यांनी केलेल्या अथक
• कार्यामुळे त्यांना ‘लोकांचे राष्ट्रपती’ (People’s President) म्हणून ओळखले जाते.
• त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय नवोपक्रम दिन (National Innovation Day) आणि जागतिक विद्यार्थी दिन (World Students' Day) म्हणून साजरी केला जातो.
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
• जन्म : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला.
• त्यांचे संपूर्ण नाव : डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam) असे आहे.
• शिक्षण : त्यांनी 1954 मध्ये त्रिची येथिल सेंट जोसेफ कॉलेज मधून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली.
• 1957 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
• 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केले.
• त्यांनी अनेक यशस्वी क्षेपणास्त्रे (मिसाइल) तयार करण्यासाठी कार्यक्रम आखले, ज्यामुळे त्यांना “मिसाइल मॅन ऑफ इंडिया” असे म्हटले जाते.

अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान (Space Technology) :
• प्रकल्प संचालक म्हणून, डॉ. अब्दुल कलाम यांनी भारतातील पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-III) विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
• या प्रक्षेपण वाहनाने जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रहाला पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या इंजेक्ट केले.
• इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपण वाहन (Satellite Launch Vehicle) कार्यक्रमाच्या उत्क्रांतीसाठी, विशेषतः PSLV कॉन्फिगरेशनसाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

संरक्षण आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात योगदान (Defence and Missile Technology) :
• ते इंटिग्रेटेड गाईडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) चे मुख्य कार्यकारी होते.
• भारताच्या संरक्षण क्षमतांना बळ देणारे अग्नी मिसाइल आणि पृथ्वी मिसाइल विकसित करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
• पोखरण-II : 1998 मध्ये पोखरण येथे भारताच्या अणुचाचण्यांच्या प्रकल्पात ते एक प्रमुख व्यक्ति होते.
• या अणुचाचण्यांनी भारताची आण्विक क्षमता प्रदर्शित केली आणि भारताची सुरक्षा मजबूत केली.

हलके लढाऊ विमान प्रकल्प (Light Combat Aircraft project)
• देशाच्या हलके लढाऊ विमान प्रकल्पात त्यांचा सहभाग होता.
• तसेच लढाऊ विमानात उड्डाण करणारे ते पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले.
• त्यांनी भारतातील पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट ‘नंदी’ डिझाइन करण्यास मदत केली.
• हॉवरक्राफ्ट हे एक असे वाहन आहे जे जमिनीवरून, पाण्यावर, चिखलावर आणि बर्फावरून प्रवास करू शकते.

आरोग्यसेवेत योगदान (Medical and Healthcare) :
• कलाम-राजू स्टेंट : एपीजे अब्दुल कलाम यांनी हृदयरोगतज्ज्ञ बी. सोमा राजू यांच्या सहकार्याने कोरोनरी हृदयविकारासाठी कोरोनरी स्टेंटची रचना केली.
• या उपकरणामुळे भारतात आयात केलेल्या कोरोनरी स्टेंटच्या किमती ५०% पेक्षा जास्त कमी झाल्या.

पुरस्कार आणि सन्मान :
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देश - विदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
• भारतरत्न
• पद्मविभूषण
• पद्मभूषण,
• वीर सावरकर पुरस्कार
• राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार”
• The SASTRA "रामानुजन पुरस्कार"
• किंग चार्ल्स II मेडल (युनायटेड किंगडम कडून)
• हूवर मेडल (अमेरिकन सन्मानाने सन्मानित)

साहित्य :
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे :
• विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र) (मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद)
• इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद)
• ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ ‘(भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद)
• इंडिया – माय-ड्रीम
• एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन
• फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन

मृत्यू :
27 जुलै 2015 रोजी - शिलाँग(मेघालय)
• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना , डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कोसळले आणि 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
