
चालू घडामोडी 15, ऑक्टोबर 2024

संयुक्त राष्ट्रे बाल निधी म्हणजे काय ?
What is UNICEF ?
बातमी काय आहे ?
अलीकडेच, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) ने म्हटले आहे की भारतीय पुरवठादार हे जागतिक स्तरावर बालकांना आरोग्य आणि पोषण सहाय्य प्रदान करणारे तिसरे मोठे पुरवठादार (suppliers) आहेत.
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) युनिसेफ (UNICEF) बद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे
2. युनिसेफ (UNICEF) चे मुख्यालय न्यूयॉर्क शहर येथे आहे.
3. दोन्ही विधाने योग्य
4. दोन्ही विधाने अयोग्य
उत्तर : दोन्ही विधाने योग्य

युनिसेफ (UNICEF) म्हणजे काय ?
• संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची (United Nations) एक विशेष संस्था आहे.
• युनिसेफ (UNICEF) म्हणजे United Nations Children's Fund
• युनिसेफ ला संयुक्त राष्ट्रे बाल निधी असेही म्हणतात.
• जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• दुसऱ्या महायुद्धामुळे उध्वस्त झालेल्या देशांतील मुले आणि मातांना आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी 11 डिसेंबर 1946 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने युनिसेफ (United Nations Children's Fund) तयार केला.
• युनिसेफ (UNICEF) प्रत्येक मुलाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी 190 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये कार्य करते.
युनिसेफ (UNICEF) चे मुख्यालय (Headquarters) कोठे आहे ?
युनिसेफ (UNICEF) चे मुख्यालय न्यूयॉर्क शहर येथे आहे.
युनिसेफ ला निधी कसा दिला जातो ?
How the Funding is done ?
• जगभरातील लाखो लोक आणि सरकारी, नागरी समाज आणि खाजगी क्षेत्रातील भागीदार युनिसेफला निधी देतात.
• युनिसेफला केवळ ऐच्छिक योगदानाद्वारे निधी दिला जातो.
• राष्ट्रीय समित्या एकत्रितपणे युनिसेफच्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे एक तृतीयांश भाग (1/3) निधी म्हणून जमा करतात.
युनिसेफ (UNICEF) काय काम करते ?
युनिसेफच्या कार्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
• बाल विकास आणि पोषण
• बाल संरक्षण
• शिक्षण
• बाल पर्यावरण
• पोलिओ निर्मूलन
• पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य
• मुले आणि एड्स
• सामाजिक धोरण, नियोजन, देखरेख आणि मूल्यमापन
• आणीबाणीची तयारी आणि प्रतिसाद.
युनिसेफ (UNICEF) आणि भारत :
• युनिसेफने 1949 मध्ये तीन कर्मचारी सदस्यांसह भारतात आपले काम सुरू केले.
• सध्या, ते 16 राज्यांमध्ये भारतातील मुलांच्या हक्कांसाठी काम करत आहेत.
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन
International Day of Rural Women
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा.
अ) दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरी केला जातो.
ब) हा दिवस ग्रामीण महिलांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधतो.
क) 2016 पासून भारतात 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.
वरील पैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत ?
1. फक्त अ बरोबर
2. अ आणि ब बरोबर
3. अ आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ, ब आणि क बरोबर

• ग्रामीण महिलांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरी केला जातो.
• 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (United Nations General Assembly) आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची स्थापना केली.
पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
15 ऑक्टोबर 2008 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन का साजरी करतात ?
• ग्रामीण महिलांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच आव्हानांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी
• हा दिवस लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाची भूमिका अधोरेखित करतो.
• ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व पटवून देणारा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो.
• शेती, अन्न सुरक्षा, कुटुंबाचे पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे.
ग्रामीण महिलांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या ?
• ग्रामीण भागातील रूढी -परंपरा यांमुळे ग्रामीण महिलांना लैंगिक असमानता आणि भेदभाव यांना सामोरे जावे लागते.
• शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी आणि इतर सामाजिक सेवांमध्ये ग्रामीण महिलांना समान संधी मिळत नाही.
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
ग्रामीण स्त्रिया आपल्या सामूहिक भविष्यासाठी निसर्ग टिकवून ठेवतात.
Rural Women Sustaining Nature for our Collective Future.
राष्ट्रीय महिला किसान दिवस
National Women Farmer's Day
• शेतीच्या विविध पैलूंमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान ओळखण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.
• कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून 2016 पासून राष्ट्रीय महिला किसान दिवस साजरा केला जातो.
गोदावरी नदी
बातमी काय आहे ?
नाशिक महानगरपालिकेने गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या स्वच्छ करण्यासाठी खाजगी एजन्सीकडून काम करण्याची योजना आखली आहे.
Subject : GS - भूगोल - नदी प्रणाली
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते ? (MPSC संयुक्त गट ब 2019)
1. तापी पूर्णा खोरे
2. कृष्णा खोरे
3. गोदावरी खोरे
4. भीमा खोरे
उत्तर : गोदावरी खोरे

गोदावरी नदी बद्दल महत्त्वाची माहिती :
• गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
कोणत्या नदीस भारताची दक्षिण गंगा असे म्हणतात ?
• गोदावरी नदीच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रांची ठिकाणी आहेत म्हणून या नदीस दक्षिणगंगा किंवा दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात.
• भारतातील पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्यामुळे गोदावरी नदीला वृद्ध गंगा (Old Ganga) असेही म्हणतात.
गोदावरी नदी चे खोरे (Drainage Basin) :
• गोदावरी नदीचे खोरे 3,12,812 चौरस किमी क्षेत्रफळाचे आहे.
• भारताच्या 10 % टक्के क्षेत्र गोदावरी नदीने व्यापले आहे.
• ज्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. तर मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पुद्दुचेरीच्या छोटा भाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे.
• महाराष्ट्राच्या 49 % क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापले आहे.
• महाराष्ट्रात गोदावरी नदीचे खोरे 1,53,779 चौरस किमी आहे.
गोदावरी नदी कोठे उगम पावते ?
नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे.
गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे ?
गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी आहे.
महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी किती आहे ?
महाराष्ट्रात गोदावरी नदीचा प्रवाह 668 किमी आहे.
गोदावरी नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते ?
आंध्र प्रदेशातून वाहत पुढे गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या ?
• डावा किनारा (Left Bank Tributaries) : कादवा, शिवना, दुधना, पूर्णा, प्राणहिता( पैनगंगा,वर्धा, वैनगंगा), इंद्रावती, शबरी
• उजवा किनारा (Right Bank Tributaries) : प्रवरा, मुळा, सिंदफणा, मांजरा, मानेर, किन्नरसानी.
गोदावरी नदीच्या काठावर कोणकोणती शहरे/ ठिकाणे वसलेली आहे ?
• महाराष्ट्रातील : त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड
• त्याचबरोबर भद्राचलम, निजामाबाद, राजमुंद्री, बालाघाट, यानम आणि कोव्वूर ही गोदावरी नदीच्या काठावरील इतर महत्त्वाची ठिकाणे आहेत.
गोदावरी नदीवरील महत्त्वाची धरणे कोणती ?
• गंगापूर धरण (नाशिक)
• अप्पर वैतरणा जलाशय ( मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी)
• जायकवाडी धरण (पैठणजवळ)
• श्रीराम सागर धरण (आदिलाबाद आणि निजामाबाद जिल्ह्याच्या सीमेवर)
• सर आर्थर कॉटन बॅरेज ( या बॅरेजचे सिंचन कालवे राष्ट्रीय जलमार्ग 4 चा भाग बनतात.)