
चालू घडामोडी 16, ऑक्टोबर 2024

NSG Raising Day
NSG च्या सर्व जवानांचे विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय सुरक्षा दलाची (National Security Guard) स्थापना केव्हा करण्यात आली ?
1. 1952
2. 1962
3. 1986
4. 2008
उत्तर : 1986

NSG चा इतिहास- स्थापना :
• राष्ट्रीय सुरक्षा दल (National Security Guard) स्थापना दिवस (रेझिंग डे) 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
• केंद्रीय मंत्रिमंडळाने 1984 मध्ये दहशतवादाच्या विविध अभिव्यक्तींचा सामना करण्यासाठी अत्यंत प्रेरित, विशेष सुसज्ज आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले फेडरल आकस्मिक दल तयार करण्याचा निर्णय घेतला.
• 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार (सुवर्ण मंदिर, अमृतसर येथून अतिरेकी धार्मिक नेत्याला हटवण्यासाठी करण्यात आलेली भारतीय लष्करी कारवाई), अक्षरधाम मंदिरावरील हल्ला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, अशांततेपासून राज्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी National Security Guard (NSG) या दलाची स्थापना करण्यात आली.
• कायदा : National Security Guard, हे दल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कायदा, 1986 (National Security Guard Act, 1986) द्वारे अस्तित्वात आले.
• NSG हे जर्मनीच्या GSG-9 आणि युनायटेड किंगडमच्या SAS या एलिट अँटी टेरर फोर्सवर आधारित आहे.
• Black Cats : त्यांच्या घातक, सर्व-काळ्या गणवेशामुळे NSG ला अनौपचारिकपणे ‘Black Cats’ म्हणूनही संबोधले जाते.
• मंत्रालय (Ministry) : NSG, हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते.
NSG मध्ये दोन पूरक घटक आहेत :
1. विशेष कृती गट (Special Action Group ) : ज्यामध्ये लष्कराच्या जवानांचा समावेश आहे.
2. विशेष रेंजर्स ग्रुप (Special Rangers Group) : ज्यामध्ये राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
NSG चे ब्रीदवाक्य (motto) काय आहे ?
'सर्वत्र, सर्वोत्तम, सुरक्षा' ( 'Sarvatra, Sarvottam, Suraksha') हे NSG चे ब्रीदवाक्य आहे.
NSG चे मुख्यालय (Headquarters) कोठे आहे ?
NSG चे मुख्यालय गुरुग्राम येथील मानेसर या ठिकाणी आहे.
NSG ने हाती घेतलेल्या ऑपरेशन्स :
• ऑपरेशन ब्लॅक थंडर (Operation Black Thunder) : गोल्डन टेंपल, अमृतसर, 1986 आणि 1988
• ऑपरेशन अश्वमेध (Operation Ashwamedh) : इंडियन एअरलाइन्स फ्लाइट-IC427 हायजॅकिंग, भारत, 1993
• ऑपरेशन थंडरबोल्ट किंवा वज्र शक्ती (Operation Thunderbolt or Vajra Shakti) : अक्षरधाम मंदिर हल्ला, गुजरात, 2002
• ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो (Operation Black Tornado) : 26 नोव्हेंबर 2008 मुंबई हल्ला
कल्लेश्वर मंदिर
Kalleshwar Temple
बातमी काय आहे ?
अलीकडेच, प्राचीन कल्लेश्वर मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान 13व्या शतकातील दगडी शिलालेख किंवा वीरगल्लू सापडला आहे.
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच, प्राचीन कल्लेश्वर मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान 13व्या शतकातील दगडी शिलालेख सापडला. तर हे कल्लेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. केरळ
3. तामिळनाडू
4. कर्नाटक
उत्तर : कर्नाटक

शिलालेखावर काय सापडले ?
• 13व्या शतकातील दगडी शिलालेख, ज्याला "वीरगल्लू" असेही म्हणतात.
• हा शिलालेख कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर तालुक्यातील एलीहोल गावात सापडला.
• हा शिलालेख ई. स. 1283 मध्ये तयार करण्यात आला होता.
• शिलालेख कोळशाच्या दगडापासून (charcoal stone) बनवलेला असून त्याची लांबी सुमारे 4 फूट आणि 2.5 फूट रुंद आहे.
• हा दगडी शिलालेख या प्रदेशाच्या इतिहासाची, विशेषत: देवगिरी यादव म्हटल्या जाणाऱ्या सेवुन राजवंशाशी संबंधित महत्त्वाची माहिती देतो.
• यात सेवुन घराण्यातील एक शासक रामचंद्र चक्रवर्ती यांचा सन्मान करणारा पाच ओळींचा शिलालेख आहे, ज्यांना यादव नारायण भुजबाला प्रौधप्रताप चक्रवर्ती या नावानेही ओळखले जात होते.
सेवुन राजवंश बद्दल (Sevuna Dynasty) :
• पुरातत्वशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, सेवुन राजवंश हे कन्नड भाषिक राज्य होते जे सध्याच्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पसरले होते.
• नव्याने सापडलेल्या शिलालेखाचा नायक रामचंद्र चक्रवर्ती याने 1271 ते 1312 पर्यंत राज्य केले.
• तो त्याच्या लष्करी विजयासाठी आणि संस्कृतीच्या समर्थनासाठी ओळखला जात असे.
• या राजवंशाची राजधानी देवगिरी होती, जी आज दौलताबाद म्हणून ओळखली जाते.
कल्लेश्वर मंदिराबद्दल थोडक्यात माहिती :
• हे कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील बागाली गावात स्थित एक हिंदू मंदिर आहे.
• हे या प्रदेशातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे आणि हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
• हे मंदिर दोन कन्नड राजवंशांच्या काळात बांधले गेले.
1) १०व्या शतकाच्या मध्यात राष्ट्रकूट राजवंश आणि
2) पाश्चात्य चालुक्य साम्राज्य संस्थापक राजा तैलपा II च्या कारकिर्दीत सुमारे ई. स. 987 मध्ये.
• मंदिराचे शिखर हे चोला वास्तुकलेचा उत्तम उदाहरण आहे.
• मंदिरात एक मोठे शिवलिंग आहे, जे हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते.
• हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने(Archaeological Survey of India) राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून संरक्षित केले आहे.
जागतिक अन्न दिन 2024
World Food Day 2024
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक अन्न दिन केव्हा साजरी करतात ?
1. 1 जानेवारी
2. 1 जून
3. 10 सप्टेंबर
4. 16 ऑक्टोबर
उत्तर : 16 ऑक्टोबर

दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जग जागतिक अन्न दिन साजरा करतो.
जागतिक अन्न दिन का साजरी करतात ?
• गरिबी आणि उपासमारीच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी.
• प्रत्येक भुकेल्या व गरजू व्यक्तीला सकस अन्न मिळावे, अन्नाचा अपव्यय कमी व्हावा आणि अन्न उत्पादन व शेतीला प्रोत्साहन द्यावे व त्या दिशेने प्रयत्न वाढवावेत, या उद्देशाने जागतिक जनजागृती व कृतीला चालना देण्यासाठी दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी 'जागतिक अन्न दिन' साजरा केला जातो.
16 ऑक्टोबर या तारखेलाच जागतिक अन्न दिवस का साजरी करण्यात येतो ?
• 16 ऑक्टोबर 1945 रोजी, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेची (Food and Agriculture Organisation) स्थापना झाली. म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक अन्न दिनाची कल्पना कोणी मांडली ?
• जागतिक अन्न दिनाची कल्पना डॉ. पाल रोमानी यांनी दिली होती, जे हंगेरी देशाचे माजी कृषी आणि अन्न मंत्री होते.
• 1979 मध्ये हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न मंत्री डॉ. पाल रोमानी यांच्या नेतृत्वाखालील हंगेरियन शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या परिषदेच्या 20 व्या सत्रात जागतिक अन्न दिन जगभरात साजरा करण्याची कल्पना सुचवली.
• तेव्हापासून दरवर्षी 150 हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो
जागतिक अन्न दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
उत्तम जीवन आणि चांगल्या भविष्यासाठी खाद्यपदार्थांचे अधिकार
Right to Food for a Better Life and a Better Future.
अन्न सुरक्षेसाठी भारताची वचनबद्धता :
• जगाच्या लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या भारताने यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
• वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (World Wide Fund for Nature) च्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालाने G20 देशांमध्ये सर्वात शाश्वत म्हणून भारताच्या अन्न सेवन पद्धतीची प्रशंसा केली आहे.
• भुकेचा सामना करणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे, कुपोषण, दारिद्र्य निर्मूलन आणि कृषी शाश्वतता यासाठी विविध कार्यक्रम, धोरणे आणि योजना सरकार राबवत आहेत
उदाहरणार्थ :
राष्ट्रीय पोषण अभियान (National Nutrition Mission)
0-6 वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान माता यांचे पोषण वाढविण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान सुरू करण्यात आले.
फूड फोर्टिफिकेशनमध्ये (Food fortification) : रासायनिक, जैविक किंवा भौतिक माध्यमांद्वारे अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा समावेश होतो.
फोर्टिफाइड खाद्यपदार्थांमध्ये सामान्यतः तांदूळ, गव्हाचे पीठ, खाद्यतेल, मीठ आणि दूध यांचा समावेश होतो.
उदाहरणार्थ : मीठामध्ये आयोडिन चे फोर्टिफिकेशन करणे.
झिरो हंगर प्रोग्राम (Zero Hunger Program) : कृषी, आरोग्य आणि पोषण वाढवण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये भारतात याची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission)