
चालू घडामोडी 20, मार्च 2025 | जागतिक चिमणी दिन | World Sparrow Day

जागतिक चिमणी दिन
World Sparrow Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो ?
(महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस भरती 2021)
1. 21 मार्च
2. 20 मार्च
3. 3 मार्च
4. 1 मार्च
उत्तर : 20 मार्च
• दरवर्षी जागतिक चिमणी दिन 20 मार्च रोजी साजरी केला जातो.
• चिमणीला, हिंदी मध्ये “गोरैया” , तमिळ मध्ये “कुरुवी” आणि उर्दू त “चिरिया” अशा नावानेही ओळखले जाते.
जागतिक चिमणी दिन का साजरी करतात ?
• चिमणी निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे.
• वाढतं शहरीकरण, प्रदूषण यांचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे.
• चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे.
• त्याचप्रमाणे चिमण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
पहिला जागतिक चिमणी दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• पहिला जागतिक चिमणी दिन 20 मार्च 2010 रोजी साजरी करण्यात आला.
• भारताच्या, नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि फ्रान्सच्या इको-सिस ॲक्शन फाउंडेशनच्या पुढाकाराने 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून अधिकृतपणे साजरा होऊ लागला.
• नेचर फॉरएव्हर सोसायटी या संस्थेची स्थापना भारतातील पर्यावरणतज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी केली.
• मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 मध्ये त्यांना “हिरोज ऑफ द एन्व्हायर्नमेंट” सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.
2025 या वर्षी जागतिक चिमणी दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
" निसर्गाच्या छोट्या दूतांना आदरांजली " ही 2025 या वर्षाची जागतिक चिमणी दिनाची संकल्पना आहे.
"A Tribute to Nature's Tiny Messengers".
चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व :
• पर्यावरणीय संतुलन राखण्यात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
• जैवविविधता संवर्धन : चिमणी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात निरोगी परिसंस्थेचे सूचक (Indicators of a healthy ecosystem) म्हणून काम करते.
• नैसर्गिक कीटक नियंत्रण : ते कीटक खातात, ज्यामुळे कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
• परागण आणि बीजप्रसार : त्यांच्या कृतीमुळे परागण आणि बीजप्रसार होऊन विविध वनस्पतींची वाढ होण्यास मदत होते.
चिमणी कोणत्या राज्याचा/ केंद्र शासित प्रदेशाचा राज्यपक्षी आहे ?
चिमणी बिहार आणि दिल्लीचा राज्य पक्षी आहे.