
चालू घडामोडी 17, ऑक्टोबर 2024

Mechazilla म्हणजे काय ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले Mechazilla हे कशाशी संबंधित आहे ?
1. नवीन लस
2. व्हायरस
3. रॉकेट बुस्टर
4. लष्करी युद्ध अभ्यास
उत्तर : रॉकेट बुस्टर

• अलीकडेच, SpaceX ने “Mechazilla” नावाच्या नाविन्यपूर्ण रचनेचा वापर करून त्याचे स्टारशिप रॉकेट उतरवून अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
• SpaceX ने त्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट Starship चे बूस्टर यशस्वीरित्या उतरवून इतिहास रचला आहे.
• यामुळे भविष्यातील मोहिमांमध्ये कोणत्याही एका रॉकेटचा एकापेक्षा जास्त वेळा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
• स्टारशिप रॉकेटचा बूस्टर 96 किमी उंचीवरून लाँचपॅडवर परतले आणि त्याची यशस्वी लँडिंग झाली.
Mechazilla म्हणजे काय ?
• SpaceX च्या Starbase वरील मोठ्या 400-ft रॉकेट-कॅचिंग स्ट्रक्चरसाठी हे टोपणनाव आहे.
• यात दोन प्रचंड यांत्रिक हात आहेत, ज्यांना "चॉपस्टिक्स" (Vhopsticks) म्हणून संबोधले जाते.
• हे हात सुपर हेवी बूस्टर पृथ्वीवर परत येताना त्यांना हवेतच पकडण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
Mechazilla नेमकं कसं काम करत ?
प्रक्षेपण आणि आरोहण (Launch and Ascent) : स्पेसएक्स स्टारशिप रॉकेट, त्याच्या सुपर हेवी बूस्टरसह, जमिनीवरून प्रक्षेपित (Launch) केले जाते.
बूस्टर सेपरेशन (Booster Separation) : विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर बूस्टर रॉकेटच्या वरच्या टप्प्यातील भागापासून वेगळे होते.
नियंत्रित डिसेंट (Controlled Descent) : बूस्टर त्याचा मार्ग नियंत्रित करण्यासाठी अचूक थ्रस्टर्स वापरून पृथ्वीवर परत येण्यास सुरुवात करतो.
बूस्टर पकडणे (Catching the Booster) : बूस्टर जमिनीच्या जवळ येत असताना, मेकाझिलाचे हात कॅचसाठी तयार होतात. बूस्टर थोडा वेळ घिरट्या घालतो, ज्यामुळे मेकाझिलाचे हात सुरक्षितपणे बूस्टरला पकडू शकतात अशा प्रकारे बूस्टरची नियंत्रित लँडिंग पूर्ण होईल.
Mechazilla येवढे महत्वाचे का आहे ?
1. कमी झालेली झीज : बूस्टर हवेत पकडल्याने, मेकाझिला सामान्यत: पारंपारिक लँडिंगशी तुलनेत बूस्टरची कमी हानी होते.
2. जलद टर्नअराउंड : बूस्टर पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकते त्यामुळे नवीन मोहिम जलद लॅान्च करणे शक्य होईल.
3. खर्च कमी : बूस्टरचा अधिक जलद आणि सहज वापर केल्याने अंतराळ मोहिमांचा एकूण खर्च कमी होतो.
वॉलोंगची लढाई
62nd Anniversary of the Battle of Walong
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण (Defence)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वॉलोंगच्या लढाईच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय लष्कर महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. तर हे युद्ध कोणा सोबत लढले गेले ?
1. भारत - पाकिस्तान
2. भारत - चीन
3. भारत - म्यानमार
4. भारत - बांग्लादेश
उत्तर : भारत - चीन

बातमी काय आहे ?
1962 मध्ये झालेल्या वॉलोंगच्या लढाईच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय लष्कर महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
ऐतिहासिक वॉलोंगच्या लढाईबद्दल माहिती :
• भारत-चीन-म्यानमार ट्राय जंक्शनजवळ अरुणाचल प्रदेशात १९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान वॉलोंगची लढाई झाली.
• केवळ 2,500 भारतीय सैन्याने मोठ्या पराक्रमाने तब्बल 15,000 चिनी सैनिकांना तोंड दिले.
• येथिल युद्धात भारतीय लष्कराच्या तुकड्यांमध्ये कुमाऊं रेजिमेंट, शीख रेजिमेंट, गोरखा रायफल्स, आसाम रायफल्स आणि डोग्रा रेजिमेंटच्या बटालियनचा समावेश होता.
• दारुगोळा आणि पुरवठा यांचा प्रचंड तुटवडा असतानाही भारतीय सैन्याने दृढतेने आणि धैर्याने चिनी सैनिकांना जवळपास तीन आठवडे रोखून धरले.
• या युद्धामुळे भारताचे मोठे नुकसान झाले, सुमारे 830 सैनिक एकतर मारले गेले, जखमी झाले किंवा पकडले गेले.
• हे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.
वॉलोंग डे सेलिब्रेशन कसे असेल ?
• भारताच्या पूर्व आघाडीचे रक्षण करणाऱ्यांचे शौर्य आणि बलिदान साजरे करण्यासाठी 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत हे स्मरणोत्सव चालेल.
• या वर्षीच्या स्मरणार्थ व्हाईट वॉटर राफ्टिंग, मोटारसायकल आणि सायकल रॅली, रणांगण आणि साहसी ट्रेक आणि हाफ मॅरेथॉन यांसारख्या अनेक साहसी आणि सामुदायिक उपक्रमांचा समावेश असेल.
• 14 नोव्हेंबर रोजी, नव्याने नूतनीकरण केलेल्या वॉलोंग युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले जाईल.
• मिश्मी आणि मेयर कलाकारांद्वारे पुष्पहार अर्पण समारंभ, युद्धाचे वर्णन आणि पारंपारिक नृत्ये सादर केली जातील.
• लामा स्पूर येथील शौर्य स्थळ आणि प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही केले जाईल, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा सुधारण्याच्या प्रयत्नांवर भर दिला जाईल.
e-Migrate Portal
ई-माइग्रेट पोर्टल चे फायदे काय ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच लाँच केलेल्या ई-माइग्रेट पोर्टल बद्दल खालील पर्यायांपैकी योग्य असलेले पर्याय निवडा.
1. भारतीय कामगारांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे.
2. यात विमा पॉलिसी देखील देण्यात आली आहे.
3. यासाठी मोबाईल ॲप प्रथमच विकसित केले गेले आहे.
4. वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य आहेत.

बातमी काय आहे ?
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर सर यांनी भारतीय कामगारांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुधारित eMigrate v2.0 वेब पोर्टल आणि मोबाइल ॲप लाँच केले.
• लाँच तारीख : ऑक्टोबर 2024.
• मंत्रालय (Ministry) : परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs)
e-Migrate Portal चे उद्दिष्ट काय आहे ?
• परदेशात भारतीय कामगारांसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक स्थलांतराला प्रोत्साहन देणे.
• हा उपक्रम भारतीय स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.
• माहितीचा प्रवेश, दस्तऐवज, हेल्पलाइन समर्थन, सेवांसह एकत्रीकरण आणि जागरूकता मोहिमांसह विविध सेवा देऊन स्थलांतरित कामगारांसाठी सुरक्षित आणि पारदर्शक फ्रेमवर्क प्रदान करणे हे ई-माइग्रेट पोर्टल चे उद्दिष्ट आहे.
• शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अंतर्गत जागतिक स्थलांतर उद्दिष्टांशी संरेखित करणे.
e-Migrate Portal कोणत्या सेवा प्रदान करेल ?
• सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतर चॅनेलसाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
• 24×7 बहुभाषिक हेल्पलाइन : तातडीच्या समस्यांसाठी रिअल-टाइम सोल्यूशन्ससह, अनेक भाषांमध्ये स्थलांतरित कामगारांसाठी मदत प्रदान करते.
• डिजिलॉकरसह एकत्रीकरण: पासपोर्ट आणि रोजगार करार यासारखी कागदपत्रे, डिजिटल माध्यमातून कागदविरहित (paperless) सादर करता येतील.
• सोशल सिक्युरिटी नेट : विमा पॉलिसींद्वारे स्थलांतरितांसाठी सामाजिक सुरक्षेचा विस्तार करते आणि शून्य-शुल्क डिजिटल पेमेंट सेवांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी करते.