
चालू घडामोडी 20, मार्च 2025 | आंतरराष्ट्रीय आनंद दिन | International Day of Happiness

आंतरराष्ट्रीय आनंद दिन
International Day of Happiness
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 1 मार्च
2. 8 मार्च
3. 14 मार्च
4. 20 मार्च
उत्तर : 20 मार्च
आंतरराष्ट्रीय आनंद दिन केव्हा आणि का साजरी करतात ?
• दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च रोजी साजरी करण्यात येतो.
• आनंदी राहणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे
• मानसिक आरोग्य आणि लोककल्याण या दोन्ही गोष्टींना प्रत्येक व्यक्तीने आणि प्रशासनाने महत्त्व द्यावे, याची आठवण करुन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
• सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी मानवी हक्कांचे समर्थन करून आनंदाला आधार देणाऱ्या सोईंसीठी गुंतवणूक करण्याचे आवाहन हा दिवस करतो.
आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) कोणत्या देशाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला ?
• 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय आनंदाचे मूल्य ओळखणारा आणि सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदाचे ध्येय प्रसिद्धपणे स्वीकारणारा भूतान या देशाने हा ठराव मांडला होता.
• आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) साजरा करण्याचा प्रस्ताव भूतानच्या राजाने युनायटेड नेशन्सकडे पाठवला होता.
संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी केव्हा दिली ?
संयुक्त राष्ट्रांच्या सभेत 12 जुलै 2012 रोजी झालेल्या ठरावामध्ये 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.
पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
20 मार्च 2013 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरी करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
केअरिंग अँड शेअरिंग (Caring and Sharing) ही आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2025 ची संकल्पना आहे.
जागतिक आनंद दिन आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये :
जागतिक आनंद दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals) संबंधित आहे,
उदाहरणार्थ :
