
चालू घडामोडी 20, मार्च 2025 | रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार | RAMNATH GOENKA EXCELLENCE IN JOURNALISM AWARDS
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात 'रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता' पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?
(SSC 2020)
1. 2010
2. 2008
3. 2006
4. 2000
उत्तर : 2006
बातमी काय आहे ?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 19 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 19 वा ‘ रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ’ प्रदान करण्यात आले.
रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे.
• रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार 2006 मध्ये सुरू करण्यात आला.
• "द इंडियन एक्सप्रेस" आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात येतो.
• देशभरातील प्रिंट, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल माध्यमांमधील पत्रकारांना रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले जाते.
• ज्यांनी त्यांच्या व्यवसायाचे सर्वोच्च मानक राखले आहेत आणि प्रचंड आव्हानांना न जुमानता, माध्यमांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवणारे आणि लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे काम केले आहे.
• त्याचप्रमाणे पत्रकारिता करताना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सत्य, सचोटी आणि निर्भयपणा या मूल्यांचे पालन करणाऱ्या पत्रकारांना हे पुरस्कार दिले जातात.
नोट :
• सर्व पुरस्कार विजेते पाठ करू नका
• एकूण 20 श्रेणींत (कॅटेगरी) पुरस्कार देण्यात आले.
• पुरस्काराचे नाव, कधी सुरू करण्यात आला, पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा.
नमुना म्हणून पुरस्कार विजेत्यांची काही नावे दिली आहेत :
रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार विजेते
• हिंदी (प्रिंट/डिजिटल) : मृदुलिका झा (आज तक) – डंकी मार्गावरील स्थलांतर संकटावर वृत्तांकन.
• प्रादेशिक भाषा (प्रिंट/डिजिटल) : जिशा एलिझाबेथ (मध्यमम) – भारतीय तरुणांची म्यानमारमध्ये होणारी मानवी तस्करी उघडकीस आणली.
• पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान : शिबू कुमार त्रिपाठी (इंडिया टुडे) – जोशीमठ बुडण्याच्या संकटावर वृत्तांकन.
• अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल : सत्यसुंदर बारिक (द हिंदू) – ओडिशामधील स्थलांतर आणि बेपत्ता मुलींवरील वृत्तांकन.
• व्यवसाय आणि आर्थिक पत्रकारिता : त्वेश मिश्रा (इकॉनॉमिक टाईम्स) – भारतातील EV उत्पादन क्षेत्रातील अनुदान घोटाळ्याची चौकशी.
• राजकारण आणि सरकार : मैत्री पोरेचा (द हिंदू) – बालासोर रेल्वे दुर्घटना आणि त्याचे परिणाम कव्हर केले.
• क्रीडा पत्रकारिता : शहाब अली आणि अमरनाथ कश्यप (हिंदुस्तान) – सुवर्णपदक विजेत्या आशा किरण बारला यांच्या गावातील वाईट परिस्थिती उघडकीस आणली.