
चालू घडामोडी 21, मार्च 2025 | वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 | World Happiness Report 2025

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025
World Happiness Report 2025
Subject : GS - रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 च्या जागतिक आनंद अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट) नुसार भारताचा क्रमांक किती आहे ?
1. 68
2. 109
3. 118
4. 133
उत्तर : 118
बातमी काय आहे ?
• ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’ निमित्त, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केली.
• आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरी करण्यात येतो.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 कोणी प्रकाशित केला ?
• ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप, यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क च्या भागीदारीत वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 20 मार्च रोजी प्रकाशित केला.
• हा अहवाल तयार करताना देशातील उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुष्य , स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला जातो.
जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?
• वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार फिनलंड आठव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.
• अहवालानुसार फिनलंडचे लोक सर्वात आनंदी आहे.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार सर्वात कमी आनंदी देश कोणता ?
• अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या म्हणजे च 147 व्या क्रमांकावर असून
• वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार अफगाणिस्तान हा जगातील सर्वात कमी आनंदी देश आहे.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा ?
• 2025 मध्ये भारताचा 118 वा क्रमांक आहे.
• (तर 2024 मध्ये भारताचा 126 वा क्रमांक होता. )
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारत आणि शेजारील देशांची क्रमांक :
• चीन – 68 वा क्रमांक
• नेपाळ – 92 वा क्रमांक
• पाकिस्तान – 109 वा क्रमांक
• भारत – 118 वा क्रमांक
• म्यानमार - 125 वा क्रमांक
• श्रीलंका – 133 वा क्रमांक
• बांगलादेश – 134 वा क्रमांक

नोट : वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारतापुढे चीन, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश आहे हे लक्षात ठेवा.