
चालू घडामोडी 24, मार्च 2024 | शहीद दिवस : 23 मार्च | Shaheed Diwas

शहीद दिवस : 23 मार्च
Shaheed Diwas
भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना पुण्यतिथी दिनी विनम्र आदरांजली 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास, क्रांतीकारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ------- रोजी फाशी देण्यात आली.
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC MTS 2022,2023)
1. 25 मार्च 1932
2. 23 मे 1931
3. 23 मार्च 1931
4. 21 एप्रिल 1930
उत्तर : 23 मार्च 1931
शहीद-ए-आझम भगतसिंग :
• जन्म : भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी ब्रिटिश भारतात बंगा, पंजाब, (आता पाकिस्तानमध्ये) येथे एका शीख कुटुंबात झाला.
• भगतसिंग यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते.
• 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
• वयाच्या 12 व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची त्यांनी शपथ घेतली.
• स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना एकत्रित करण्यासाठी 1926 मध्ये भगतसिंग यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली.
• भगतसिंग यांना प्रेमाने शहीद-ए-आझम (अर्थ : महान शहीद) म्हणून ओळखले जाते.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू :
• हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक सशस्त्र क्रांतिकारक होते.
• जन्म : 24 ॲागस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावी एका मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला.
• (त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावचे राजगुरुनगर असे नामकरण करण्यात आले.)
• पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले.
• संस्कृत व मराठीबरोबरच इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही त्यांना चांगल्या अवगत होत्या.
• त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यांना हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा (HSRA) " गनमॅन " म्हटले जात.
हुतात्मा सुखदेव थापर :
• जन्म : सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला.
• स्वातंत्र्यलढ्यातील तरुण भरतीसाठी त्यांनी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली.
• त्यांनी तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली.
• ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) चे सदस्य होते.
• त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्मयाचा तरुणांत प्रचार केला.
• जे.पी. सॉन्डर्स यांच्या हत्येची अंमलबजावणी आणि नियोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• त्यांनी कैद्यांना होणाऱ्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ 1929 च्या तुरुंग उपोषणात भाग घेतला.
अटक, खटला आणि फाशी :
• पोलिसांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून 1928 मध्ये (लाहोर कट प्रकरण) पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याला भगतसिंग, राजगुरू आणि आझाद यांनी गोळ्या घालून ठार केले.
• 18 एप्रिल 1929 रोजी, दडपशाही ब्रिटीश कायद्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीत केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकला आणि ते स्वतः हून अटक झाले.
• नंतर लाहोर कट प्रकरणात खुनाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
• त्यांच्यावर खटला चालवण्यात आला, त्यांना दोषी ठरवण्यात आले.
• भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
• 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
• दरवर्षी 23 मार्च हा दिवस स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली म्हणून शहीद दिन म्हणून पाळला जातो.