
चालू घडामोडी 22, मार्च 2025 | सांस्कृतिक संपदा करार | Cultural Property Agreement

सांस्कृतिक संपदा करार
Cultural Property Agreement
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच मार्च 2025 मध्ये भारतीय पुरातन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी भारताने खालील पैकी कोणत्या देशाशी सांस्कृतिक संपदा करार केला ?
1. अमेरिका
2. चीन
3. मलेशिया
4. रशिया
उत्तर : अमेरिका
सांस्कृतिक संपदा करारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारतीय पुरातन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी भारत-अमेरिका यांच्यात सांस्कृतिक संपदा करार (Cultural Property Agreement) झाला.
• प्रतिबंधात्मक स्वरूपाचा करार असल्यामुळे कोणतीही कालमर्यादा किंवा लक्ष्यीत संख्या निर्धारित केलेली नाही.
सांस्कृतिक संपदा करार म्हणजे काय ? | What is the meaning of Cultural Property Agreement ?
• सांस्कृतिक संपदा करारामध्ये तांत्रिक सहाय्य, अवैध व्यापार आणि सांस्कृतिक मालमत्तेची लूट या प्रकरणांमध्ये सहकार्य आणि परस्पर सामंजस्याला चालना देण्याची तरतूद आहे.
• या करारानुसार अमेरिकन सरकारने जप्त केलेल्या नियुक्त यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही वस्तू किंवा साहित्य अमेरिका भारताला परत करेल.
• आतापर्यंत, अमेरिकेतून 588 प्राचीन वस्तू परत आणण्यात आल्या आहेत, त्यापैकी 297 वस्तू 2024 मध्ये मिळाल्या आहेत.
सांस्कृतिक संपदा करार महत्त्वाचा का आहे ?
• सांस्कृतिक मालमत्तेची बेकायदेशीर तस्करी ही एक दीर्घकालीन समस्या आहे ज्याने इतिहासात अनेक संस्कृती आणि देशांना प्रभावित केले आहे.
• हा करार सांस्कृतिक मालमत्तेची बेकायदेशीर तस्करी रोखतो आणि पुरातन वस्तू त्यांच्या मूळ ठिकाणी परत आणण्यास मदत करतो.
• 1970 च्या युनेस्को कन्व्हेन्शनला मान्यता देण्यापूर्वी भारतातून मोठ्या प्रमाणात पुरातन वस्तूंची तस्करी करण्यात आली होती आणि त्या वस्तू आता जगभरातील विविध संग्रहालये, संस्था आणि खाजगी संग्रहांमध्ये ठेवण्यात आली आहेत.
• भारताला आणि भारतीयांना त्यांचे हक्काचे असलेले परत करण्यात हा करार महत्त्वाचा आहे.