
चालू घडामोडी 22, मार्च 2025 | जागतिक जल दिन | World Water Day

जागतिक जल दिन | World Water Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ?
1. 31 मार्च
2. 22 मार्च
3. 8 मार्च
4. 1 मार्च
उत्तर : 22 मार्च
दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.
जागतिक जल दिन का साजरी करतात ?
• जागतिक जल दिन गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी
• गोड्या पाण्याच्या संसाधनांच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी
• तसेच त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
• हा दिवस शाश्वत विकास ध्येय (SDG) 6 : 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता याच्या समर्थनार्थ जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्याबद्दल प्रोत्साहित करतो.
राष्ट्रीय जल दिन कोणी घोषित केला ?
Who declared National Water Day ?
• जागतिक जल दिनाची कल्पना पहिल्यांदा 1992 मध्ये रिओ दि जानेरो (Rio de Janeiro) येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (United Nations Conference on Environment and Development) मांडण्यात आली होती.
• संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (United Nations General Assembly ) 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला.
पहिला जागतिक जल दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
पहिला जागतिक जल दिन 22 मार्च 1993 रोजी साजरी करण्यात आला.
जागतिक जल दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of World Water Day 2025?
• 2025 च्या जागतिक जल दिनाची संकल्पना "हिमनदी संवर्धन" (Glacier Preservation) ही आहे.
• 2025 ची संकल्पना जीवन आणि जलचक्र टिकवून ठेवण्यात हिमनद्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.

हिमनद्या संवर्धन महत्त्वाचे का आहे ?
• पृथ्वीवरील 70% गोड्या पाण्याचे साठे हिमनद्यांमध्ये साठवले जातात.
• हिमनद्या नैसर्गिक गोड्या पाण्याचे साठे म्हणून काम करतात.
• पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती, उद्योग आणि निरोगी परिसंस्थांसाठी हिमनदी महत्त्वाची आहे.
• वाढत्या जागतिक तापमानामुळे, हिमालय, अँडीज, आल्प्स आणि आर्क्टिक सारख्या भागातील हिमनद्या धोकादायक दराने आकुंचन पावत आहेत.
• 2025 च्या जागतिक जल दिनाचे उद्दिष्ट हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धती लागू करणे आणि हिमनद्या आणि त्यांनी प्रदान केलेल्या गोड्या पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हे आहे.