
चालू घडामोडी 21,मार्च 2025 | नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Cabinet approves setting up of Namrup IV Fertilizer Plant
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली हा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे ?
1. पंजाब
2. महाराष्ट्र
3. तामिळनाडू
4. आसाम
उत्तर : आसाम
बातमी काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली.
नामरुप IV खत कारखान्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• आसामच्या नामरुप या ठिकाणी ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया प्रकलपाची उभारणी करण्यात येणार आहे.
• या प्रकल्पाच्या माध्यमातून अंदाजे 10,601.40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
• नामरुप- IV प्रकल्पाच्या पूर्ण करण्यासाठी एकूण 48 महिने कालावधी देण्यात आला आहे.
• नामरूप-IV युनिटची स्थापना अधिक ऊर्जा कार्यक्षम (Energy Efficient) असेल.
या प्रस्तावित संयुक्त प्रकल्पात, समभागाची (Equity) विभागणी खालीलप्रमाणे असेल :

नामरुप IV खत कारखान्या प्रकल्पामुळे कोणते फायदे होतील ?
• या प्रकल्पामुळे देशातील विशेषतः ईशान्य भागात युरिया उत्पादन क्षमता वाढेल.
• यामुळे ईशान्येकडील राज्यांतील आणि, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील युरिया खतांच्या वाढत्या मागणीची पूर्तता होईल.
• यामुळे या भागातील जनतेसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी खुल्या होतील.
• त्याबरोबरच युरिया उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देखील त्याची मदत होईल