
चालू घडामोडी 21, मार्च 2025 | 14 वी दहशतवादविरोधी ADMM-Plus बैठक

14th Meeting of ADMM-Plus Experts Working Group on Counter-Terrorism | 14वी दहशतवादविरोधी ADMM-plus बैठक
Subject : GS - आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच नवी दिल्ली येथे आसियान देशातील संरक्षण मंत्र्यांची 14 वी बैठक पार पडली. या बैठकीचे सह अध्यक्ष देश कोणते ?
1. भारत व मलेशिया
2. भारत व अमेरिका
3. भारत व सिंगापूर
4. भारत व म्यानमार
उत्तर : भारत व मलेशिया
बातमी काय आहे ?
• आसियान देशातील संरक्षण मंत्र्यांची (एडीएमएम-प्लस) दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाची (EWG on CT) 14 वी बैठक 19 ते 20 मार्च 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.
• भारत व मलेशिया या बैठकीचे सह अध्यक्ष होते.
• आसियान सचिवालय, आसियान देश आणि एडीएमएम-प्लस सदस्य देश यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला.
14 वी दहशतवादविरोधी ADMM-plus तज्ञ कार्यगटाची बैठकी संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताने चालू वर्षासाठी पहिली दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाची बैठक आयोजित केली .
• दोन दिवसांच्या या बैठकीत, दहशतवाद आणि उग्रवादाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी एक मजबूत आणि व्यापक रणनीती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
• आसियान देशांच्या संरक्षण दलांचे आणि त्यांच्या संवाद भागीदारांचे प्रत्यक्ष अनुभव सामायिक करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
• या बैठकीत चालू वर्षासाठी नियोजित उपक्रम/बैठका/कार्यशाळांचा पाया रचण्यात आला.
• या बैठकीत, भारत आणि मलेशियाच्या सह-अध्यक्षांनी 2024-2027 या कालावधीच्या नियोजित उपक्रमांसाठी कार्य-योजना सादर केली.
• 2026 मध्ये मलेशियामध्ये दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाची, टॉप चर्चा/विचार विनिमय आणि
• 2027 मध्ये भारतात फील्ड प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याची घोषणा या दोन देशांनी केली.
एडीएमएम-प्लस (ADMM-Plus) म्हणजे काय ?
• ADMM-Plus चा फूल फॅार्म ASEAN Defence Ministers’ Meeting-Plus असा आहे.
• एडीएमएम-प्लस ही 10 आसियान (ASEAN) देशांच्या आणि 8 संवाद भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांची संघटना आहे.
आसियान संघटने मध्ये किती देश आहे ? आणि कोणते ?
• आसियान संघटनेमध्ये 10 देश आहे.
• ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम.

एडीएमएम-प्लस (ADMM-Plus) संघटनेतील 8 संवाद भागीदार देश कोणते ?
भारत, चीन, जपान, कोरिया प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, अमेरिका, रशिया
आसियान म्हणजे काय ? | What is ASEAN ?
• ASEAN म्हणजे Association of Southeast Asian Nations.
• आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) हा एक प्रादेशिक गट आहे.
• आसियान ही आग्नेय आशियामधील 10 स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.
• स्थापना : आसियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी गेली.
• या संघटनेचा उद्देश त्यांच्या सदस्य देशांमध्ये आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याला प्रोत्साहन देणे हे आहे.