
चालू घडामोडी 22, मार्च 2025 | मानवी कोरोनाव्हायरस HKU1 | Human Coronavirus HKU1

मानवी कोरोनाव्हायरस HKU1 | Human Coronavirus HKU1
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच कोलकाता येथील एका महिलेला मानवी कोरोना विषाणू HKU1 (HCoV-HKU1) असल्याचे निदान झाले. मानवी कोरोना विषाणू HKU1 बद्दल योग्य विधान विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) हा कोरोनाव्हायरसचा मानवांना आणि प्राण्यांनाही होऊ शकतो.
ब) HKU1 पहिल्यांदा 2004 मध्ये हाँगकाँग येथे शोधला.
क) HKU1 आणि COVID-19 सारखेच आहे.
पर्याय :
1. फक्त अ योग्य
2. फक्त अ आणि ब योग्य
3. फक्त ब आणि क योग्य
4. अ, ब आणि क योग्य
उत्तर : फक्त अ आणि ब योग्य
• क) हे विधान चुकीचे आहे.
• HKU1 आणि COVID-19 सारखे नाही.
बातमी काय आहे ?
कोलकाता येथील एका महिलेला मानवी कोरोना विषाणू HKU1 (HCoV-HKU1) असल्याचे निदान झाले आहे.
मानवी कोरोना म्हणजे काय ?
मानवी कोरोनाव्हायरस हे RNA विषाणूंचा एक गट आहे जे मानवांमध्ये श्वसनमार्गाचे संक्रमण (Respiratory Tract Infections) करतात, ज्यामध्ये सौम्य सर्दीपासून ते SARS, MERS आणि COVID-19 सारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे.
मानवी कोरोनाव्हायरस सामान्य 4 प्रकार कोणते ?
229E, NL63, OC43, आणि HKU1 हे मानवी कोरोनाव्हायरसचे सामान्य 4 प्रकार आहे.
मानवी कोरोनाव्हायरस HKU1 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मानवी कोरोनाव्हायरस HKU1 ला बीटाकोरोनाव्हायरस हॉंगकोनेन्स (Betacoronavirus Hongkonense) असेही म्हणतात.
• हा कोरोनाव्हायरसचा एक प्रकार आहे जो मानवांना आणि प्राण्यांनाही होऊ शकतो.
• मानवी कोरोनाव्हायरस HKU1 (हाँगकाँग विद्यापीठ) पहिल्यांदा 2004 मध्ये सापडला.
• मानवी कोरोनाव्हायरसची ओळख पहिल्यांदा 2004 मध्ये हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी पटवली होती, त्यामुळेच त्याला हे नाव मिळाले.
• मानवी कोरोनाव्हायरससाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार नाही.
• बहुतेक संक्रमित व्यक्ती स्वतःहून बरे होतात.
HKU1 ची लक्षणे कोणती ?

• HKU1 मध्ये, लक्षणे सहसा सौम्य असतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये, विशेषतः उपचार न केल्यास, मानवी कोरोनाव्हायरसमुळे ब्रॉन्कायओलायटिस आणि न्यूमोनिया होऊ शकतो.
HKU1 आणि COVID-19 सारखेच आहे का ?
• नाही, HKU1 हा COVID-19 पेक्षा वेगळा आहे.
• HKU1 हा एक सामान्य सर्दी-कारक कोरोनाव्हायरस आहे.
• तर COVID-19 हा SARS-CoV-2 मुळे होतो.
• COVID-19 हा एक नवीन कोरोना विषाणू आहे जो श्वसनाचे गंभीर आजार निर्माण करू शकतो.