
चालू घडामोडी 24, मार्च 2025 | महाराष्ट्र भूषण पुरस्कार | Maharashtra Bhushan Award

महाराष्ट्र भूषण पुरस्कार
Maharashtra Bhushan Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली, ते खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1. संगीत
2. चित्रकला
3. क्रिडा
4. शिल्पकला
उत्तर : शिल्पकला (Sculpture)
बातमी काय आहे ?
अलिकडेच, महाराष्ट्र राज्याचा 2024 चा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

शिल्पकार राम सुतार यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• शिल्पकार राम सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावी 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला.
• मुंबईतील जे. जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं.
शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेल्या (डिझाइन केलेल्या) काही प्रसिद्ध मूर्ती :
• स्टॅच्यू ऑफ युनिटी : (सरदार पटेल यांचा पुतळा, 182 मीटर, गुजरात) जगातील सर्वात उंच पुतळा
• महात्मा गांधींचा प्रतिष्ठित पुतळा : भारतीय संसदेसह 450+ शहरांमध्ये
• केम्पेगौडा पुतळा : 108 फूट उंच, बेंगळुरू विमानतळ
• अयोध्या राम मंदिर : भगवान राम मूर्ती डिझाइनिंग, अयोध्या
• बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा : इंदू मिल, मुंबई
• चंबळ देवी मूर्ती : 45 फूट उंच पुतळा, मध्य प्रदेशातील, गंगासागर धरण येथे
• कृष्ण-अर्जुन रथ : कुरुक्षेत्राच्या ब्रह्मसरोवरात असलेला कृष्ण-अर्जुन रथ डिझाइन
शिल्पकार राम सुतार यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार आणि सन्मान :
• पद्मश्री पुरस्कार (1999)
• टागोर पुरस्कार (2016)
• पद्मभूषण पुरस्कार (2018)
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2024)
महाराष्ट्र भूषण पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
• 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
• 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे सध्याचे स्वरूप आहे.
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो.
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये लोकप्रिय साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना देण्यात आला.
