
चालू घडामोडी 25, मार्च 2025 | राष्ट्रपती भवनात 'पर्पल फेस्ट'चे आयोजन | RASHTRAPATI BHAVAN HOSTS ‘PURPLE FEST’

राष्ट्रपती भवनात 'पर्पल फेस्ट'चे आयोजन
RASHTRAPATI BHAVAN HOSTS ‘PURPLE FEST’
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच राष्ट्रपती भवनात आयोजित 'पर्पल फेस्ट' महोत्सवाचा चा मुख्य उद्देश काय आहे ?
1. समाजात महिलांना समजून घेणे, स्वीकृती देणे आणि त्यांचा समावेश वाढवणे.
2. समाजात ट्रान्सजेंडर लोकांना समजून घेणे, स्वीकृती देणे आणि त्यांचा समावेश वाढवणे.
3. समाजात दिव्यांग व्यक्तींना समजून घेणे, स्वीकृती देणे आणि त्यांचा समावेश वाढवणे.
4. समाजात वृद्ध व्यक्तींना समजून घेणे, स्वीकृती देणे आणि त्यांचा समावेश करणे.
उत्तर : समाजात दिव्यांग व्यक्तींना समजून घेणे, स्वीकृती देणे आणि त्यांचा समावेश वाढवणे.
बातमी काय आहे ?
• नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात दिव्यांगजनांची प्रतिभा, कर्तृत्व आणि आकांक्षांचा गौरव करणारा, 'पर्पल फेस्ट' हा एक दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
• या कार्यक्रमात टाटा पॉवर, अमेरिकन इंडिया फाउंडेशन, द हंस फाउंडेशन, टेक महिंद्रा फाउंडेशन आणि इतर प्रमुख भागधारकांसोबत अभूतपूर्व भागीदारी (Collaborations) देखील झाली.
• ही भागीदारी शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि सुलभतेवर लक्ष केंद्रित करून दिव्यांगजनांच्या जीवनात शाश्वत आणि चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देईल.
पर्पल फेस्ट महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयातर्फे करण्यात आले ?
• भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे (Union Ministry of Social Justice and Empowerment) पर्पल फेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
पर्पल फेस्ट महोत्सवाचे उद्दिष्ट कोणते ?
पर्पल फेस्ट महोत्सव का आयोजित करण्यात येतो ?
• विविध प्रकारचे अपंगत्व आणि लोकांच्या जीवनावर होणाऱ्या त्याच्या परिणामांविषयी जनजागृती करणे आणि
• समाजात दिव्यांग व्यक्तींचा स्वीकार आणि समावेश याबद्दल समज वाढवणे, हे 'पर्पल फेस्ट' या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
• पर्पल फेस्ट' हा दिव्यांग व्यक्तींच्या समावेश, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
पर्पल फेस्ट महोत्सवात आयोजित उपक्रम :
• क्रीडा स्पर्धा
• डिजिटल समावेशन आणि उद्योजकता या विषयावरील कार्यशाळा
• अॅबिलिंपिक (अपंगांसाठी कौशल्य प्रदर्शन स्पर्धा)
• सृजनात्मक उपक्रम
• सांस्कृतिक कार्यक्रम