
चालू घडामोडी 25, मार्च 2025 | जागतिक क्षयरोग दिन | World Tuberculosis (TB) Day

जागतिक क्षयरोग दिन
World Tuberculosis (TB) Day
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक क्षयरोग दिन केव्हा असतो ?
1. 24 मार्च
2. 31 मार्च
3. 2 एप्रिल
4. 1 मे
उत्तर : 24 मार्च
जागतिक क्षयरोग दिन केव्हा असतो ?
क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणी लावला ?
• इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.
• त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो.
क्षयरोग (TB) आजार कसा होतो ?
• क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस (Mycobacterium Tuberculosis) नावाच्या जीवाणूंमुळे (Bacteria) होणारा रोग आहे.
• क्षयरोग (TB) हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्या किंवा शिंकण्यातील लहान थेंबांच्या श्वासाद्वारे पसरणारा एक जिवाणूजन्य आजार आहे.

क्षयरोग कसा पसरतो ?
• क्षयरोग हा फुफ्फुसात सक्रिय क्षयरोग असलेल्या लोकांनाकडून खोकला, थुंकणे, बोलणे किंवा शिंकताना हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.
क्षय रोगाची लक्षणे काय आहेत ?

क्षय रोगा वरील उपचार काय आहेत ?
• उपचाराने, TB बरा होऊ शकतो.
• प्रतिजैविकांचा (Antibiotics) कोर्स सहसा 6-18 महिन्यांसाठी घ्यावा लागतो.
जागतिक क्षयरोग दिन 2025 ची संकल्पना थीम कोणती ?
• "होय! आम्ही क्षयरोग संपवू शकतो : वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, वितरित करा" ही जागतिक क्षयरोग दिन 2025 ची संकल्पना आहे.
• Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver

• याचा अर्थ असा की आपण सर्वांनी मिळून, शाश्वत वचनबद्धता, आर्थिक गुंतवणूक आणि प्रभावी माध्यमातून व्यक्तींपर्यंत मदत पोहचवून असा क्षयरोगाचा संपवू शकतो असा होतो.
• क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत केवळ सरकारचाच नव्हे तर सामान्य नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे.
जागतिक क्षयरोग (TB) अहवाल 2024 मधील भारताबद्दल IMP माहिती :
• भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे.
• जागतिल एकूण क्षयरोगाच्या रूग्णांपैकी तब्बल 26% रुग्ण फक्त भारतात आहे.
• जागतिल एकूण क्षयरोगाशी संबंधित मृत्यू पैकी 29% मृत्यू भारतात होतात.
• 2023 मध्ये, भारतात 27 लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळले होते, त्यापैकी 25.1 लाख व्यक्तींचे निदान झाले होते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.
• 2015 ते 2023 मध्ये भारतातील क्षयरोगाच्या घटनांमध्ये 17.7% टक्के घट झाली आहे.
नि:क्षय पोषण योजना काय आहे ?
• नि:क्षय पोषण योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत सुरू केली होती.
• ही भारतातील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National Tuberculosis Elimination Program) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण योजना आहे.
• नि:क्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते.
• आर्थिक सहाय्य : जो रूग्ण TB विरोधी उपचार घेत आहेत, त्याला दर महिन्याला ₹1000 रूपये या प्रमाणे त्याच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात.